Baramati | तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 02:01 PM2023-04-15T14:01:36+5:302023-04-15T14:08:09+5:30

सकाळी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला...

baramati Sangvi village unites to protest youth's murder Accused of conspiracy to commit murder | Baramati | तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप

Baramati | तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप

googlenewsNext

सांगवी (बारामती) : जमिनीच्या वादातून सांगवी (ता. बारामती) येथे तीन दिवसांपूर्वी विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) या तरुणाचा चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे याने दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बुधवारी (दि. १२) रोजी ही सकाळच्या दरम्यान घटना घडली होती. झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या मयत विनोद फडतरेच्या कुटुंबीयाला पाठबळ देण्यासाठी व झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि. १५) सकाळी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला.

यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. तर खून करणाऱ्या विशाल फडतरे या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी यात सहभाग घेऊन गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा मिळून सह आरोपींना कठोर शासन होण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आरोपीचे संपूर्ण कुटुंबच या कटात सामील आहे, यामुळे यातील मुख्य आरोपी इतर आरोपींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी, अशी मागणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक चंद्रराव तावरे यांनी केली. यावेळी सर्व पक्षातील पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद फडतरे यांच्या हत्येनंतर कुटुंबाला दिलासा देण्यासाठी गुरुवारी (दि. १३) ग्रामस्थांकडून तातडीची बैठक घेण्यात आली होती. गावच्या इतिहासातील ही पहिलीच दुर्दैवी घटना असल्याने विशाल फडतरे सारख्या मनोवृत्तीच्या नराधमाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावात कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुनाच्या काही तासानंतर प्रत्यक्षदर्शी खून करताना पहिलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळे आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून वारंवार चुलत भावांमध्ये वितुष्ट येत होते.

गुन्हेगारांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न ; ग्रामस्थांचा आरोप...

खून करणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र, सह आरोपी असणारे गणपत फडतरे व विक्रम फडतरे यांना फरार होण्यास पोलिसांनी मदत केली. उच्च पदस्थ लोकांच्या सांगण्यावरून व विक्रम फडतरे हा पोलीस दलात असल्याने व त्यांचे लागेबांधे असल्याने माळेगाव पोलीस इतर दोन आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आरोपींच्या अटकेबाबत पोलिसांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तिघे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे गावकऱ्यांचा पोलिस व आरोपींवरील संताप यामुळे व्यक्त होताना दिसून आला.

Web Title: baramati Sangvi village unites to protest youth's murder Accused of conspiracy to commit murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.