बारामतीत तिघा खंडणीबहाद्दरांना अटक
By admin | Published: October 7, 2015 03:56 AM2015-10-07T03:56:39+5:302015-10-07T03:56:39+5:30
खंडणीचा हप्ता देत नसल्याच्या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बारामती : खंडणीचा हप्ता देत नसल्याच्या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ओझर्डे इस्टेट येथे फिर्यादी पंकज प्रभाकर झेंडे यांचे सायबर कॅफेचे दुकान आहे. आरोपी राकेश गणेश गायकवाड, किरण राजेंद्र पिसाळ, सुनील पालवे (रा. सर्व तांदूळवाडी, बारामती) यांनी पंकज झेंडे व त्यांचा कामगार दयावान दामोदरे यांना जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी फायटरने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. तसेच, दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत.
सहायक पोलीस फौजदार दिलीप सोनवणे, जालिंदर जाधव यांनी आरोपीला शारदानगर परिसरात अटक केली. त्यांच्यावर खंडणी आणि अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)