बारामती एसटी आगाराची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Published: June 1, 2017 01:35 AM2017-06-01T01:35:10+5:302017-06-01T01:35:10+5:30

शहरातील सतत वर्दळ असलेल्या एसटी बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेची हमी नाही. एकच पोलीस कर्मचारी या स्थानकात

Baramati ST Agar's Safety Airliner | बारामती एसटी आगाराची सुरक्षा ऐरणीवर

बारामती एसटी आगाराची सुरक्षा ऐरणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शहरातील सतत वर्दळ असलेल्या एसटी बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेची हमी नाही. एकच पोलीस कर्मचारी या स्थानकात बंदोबस्ताला असतो. त्यामुळे गर्दुल्यांसह फिरस्त्यांनी प्रवाशांना बसण्यासाठी केलेल्या आसनांवर पडी मारलेली असते. या बसस्थानकात मागील काही वर्षांपासून प्रवाशांचे मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर लग्न समारंभाला जाणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार देखील सतत घडत असतात. सीसीटिव्ही कॅमेरा फक्त दिखाव्यासाठी बसविले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दररोज ३० ते ४० हजार प्रवाशांची रेलचेल या बसस्थानकातून असते. परंतु, बारामती एसटी बसस्थानकाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. अन्य समस्या आहेतच. त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलामुलींचे मोबाईल चोरीचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. स्थानकात ठिय्या मांडून बसलेल्या गर्दुल्यांना हुसकावून लावण्याचे काम आगार व्यवस्थापकाचे आहे. परंतु, पोलिसांवर जबाबदारी ढकलून दिले जाते. वास्तविक या ठिकाणी पोलीस चौकीच उभारली जावी. त्याठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते.
प्रवाशांना हेरून लुटण्याचे प्रमाण वाढत असताना बसस्थानक प्रशासन पोलीस यंत्रणा देखील गाफील आहे. या ठिकाणी एकट्या प्रवाशाला गाठून भरदिवसा लुटण्याचे प्रकार देखील घडतात. काही वेळा रात्रीच्या वेळी गाड्या नसल्याने मुक्कामी असणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितेची हमी नाही. त्यांना देखील लुबाडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे एसटी बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आठवड्याभरात या बसस्थानकातून महिलांचे दागिने चोरून जाण्याचे प्रमाण वाढले. बारामती शहरातील बसस्थानकातील सुरक्षायंत्रणा नियोजना अभावी निरर्थक ठरत आहे. बाहेरगावी निघालेल्या विवाहितेचे ८० हजार रुपयांचे दागिने बसस्थानकात चोरुन नेण्यात आले. सारीका यशवंत जाधव (रा. सिसोदीया हॉस्पिटल समोर, बारामती) यांनी या प्रकरणी शहर पोलीसांत फिर्याद दिली आहे.
बारामती बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करताना त्यांच्या पर्समधून चार तोळे वजनाची मोहनमाळ चोरट्याने चोरली. बसमध्ये बसल्यानंतर पर्स उघडी दिसल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. बसस्थानकात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरीचे प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित होत नाही. त्यामध्ये स्पष्ट घटना चित्रित होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सीसीटीव्हीची दिशा बदलण्याची गरज आहे. घटना चित्रित होतील अशा कोनातून सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे, असे या स्थानकाच्या अधिकाऱ्यांनीच सांगितले. वास्तविक या घटना घडत असताना त्यांच्याकडूनच सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या दिशा बदलण्याची गरज आहे. मुक्ती ग्रुप या संस्थेने सीसीटिव्ही कॅमेरे बसविले. पुढची जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे. मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने भरदिवसा देखील दागिने लंपास होण्याचे प्रकार घडतात. मात्र, पोलिसांना हातावर हात मारून बसण्याशिवाय पर्याय नसतो.

नो पार्किंग झोनमध्येच पार्किंग करण्यासाठी गर्दी


बारामती बसस्थानकात प्रवाशांना पार्किंगसाठी १ हजार स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, नो पार्किंग झोनमध्येच पार्किंग करण्यासाठी गर्दी होत आहे. त्या प्रयत्नातून अनेक प्रवाशी थेट एसटी फलाटाजवळ पोहोचतात. प्रवाशांना अपघाताचा धोका आहे. नो पार्किंग झोनमधील प्रवाशांबाबत पोलिसांना कळवुन देखील कारवाई होत नाही, असे आगारप्रमुखांनी सांगितले.

Web Title: Baramati ST Agar's Safety Airliner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.