बारामती तालुका १०० टक्के हगणदरीमुक्त
By admin | Published: March 31, 2017 02:18 AM2017-03-31T02:18:28+5:302017-03-31T02:18:28+5:30
तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू होते
बारामती : तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींना दिलेली उद्दिष्टपूर्ती साध्य करत तालुका शंभर टक्के हगणदरीमुक्त केला, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.
प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी साथ दिल्यामुळे ही उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे. या कामासाठी
पंचायत समितीमधील सहायक गटविकास अधिकारी मिलिंद
मोरे, विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे, अंकुश खांडेकर, अजित देसाई, जिल्हा परिषदेतील स्वच्छता समन्वयक शिंदे, गारेख आटोळे, संतोष अवघडे, स्मिता खलाटे, विशाल सावंत यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या तत्कालीन सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शौचालय बांधण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिल्याचे गटविकास अधिकारी काळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
तालुक्यातील एकूण ९९ ग्रामंपचायतींमधील एकूण ५८ हजार ८८३ कुटुंबांपैकीमार्च २०१६ पर्यंत ४६ हजार ५२० कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा होती. उर्वरित १२ हजार ३६३ कुटुंबांना शौचालये बांधून तालुका मार्च २०१७ पर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट साध्य कारण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांच्या नेतृत्वाखाली बारामती पंचायत समितीने सर्व पातळीवर प्रयत्न केले.’’
- प्रमोद काळे, माहिती गटविकास अधिकारी