बारामती तालुका नाभिक संघटनेच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:34+5:302021-08-27T04:14:34+5:30
बारामती: बारामती तालुका नाभिक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या वेळी संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून पै. सुधाकर माने ...
बारामती: बारामती तालुका नाभिक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या वेळी संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून पै. सुधाकर माने यांची निवड करण्यात आली.
संघटनेची इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: कार्याध्यक्ष प्रा. सुरेश साळुखे, उपाध्यक्ष सुदाम कढणे, सचिव किरण किर्वे, खजिनदार गणेश चौधरी, सहसचिव किसन भाग्यवंत यांची निवड करण्यात आली. या वेळी संघटनेची जनरल मिटिंग संघटनेचे माजी अध्यक्ष नवनाथ आपुणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नवनियुक्त अध्यक्ष माने यांनी बोलताना सांगितले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील लाभार्थ्यांना देणे, युवक-युवतींसाठी रोजगार प्रशिक्षण शिबिर, वधू-वर सूचक मेळावे आदी उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करू, समाजातील विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे माने म्हणाले. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कटिंग-दाढीच्या दरामध्ये १५% वाढ करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सदर दरवाढ ही १५ ऑगस्ट २०२१ पासून लागू करण्यात आली आहे. या वेळी बैठकीसाठी ज्येष्ठ नेते अनिल दळवी, हेमंत जाधव, महेश वारुळे, महेंद्र यादव, राधेश्याम साळुके आदी उपस्थित होते.
सुधाकर माने
२६०८२०२१बारामती—०८