बारामतीत बोलायला कंठ फुटतो, गिरीष बापटांचा अजित पवारांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:09 AM2018-09-01T00:09:42+5:302018-09-01T00:09:54+5:30
पालकमंत्री गिरीश बापट : लोकांनी अण्णांचा आदर ठेवावा
सांगवी : ‘माझी तब्येत बरी नाही. म्हणजे पुण्यात असल्यास माझा घसा बसतो. मात्र, बारामतीत आल्यावर बोलायला माझा कंठ फुटतो. बारामतीतल्या काही लोकांनी अण्णांचा आदर ठेवावा,’ असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता पालकमंत्री गिरीश बापट यांनी लगावला. तर, सांगवीच्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ५१ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांना भारतीय साखर कारखानदारीतील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेकडून सहकार महर्षी पुरस्काराने गौरवल्याबद्दल सांगवी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री बापट, विविध संस्थांच्या वतीने सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला, त्या वेळी बापट बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘काही लोक भाजपा शेतकरीविरोधी असल्याचे सांगतात. परंतु, भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी धोरण आखत आहे. राज्यात आणि देशात सरकार तळागाळातील लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करीत असून जनताही योग्य दाद देईल. सांगली, जळगावच्या निवडणुकीत ते दाखवून दिले.’’
या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साखर संघ, अध्यक्ष माळेगाव साखर कारखाना रंजन तावरे, माजी अध्यक्ष सोमेश्वर साखर कारखाना शहाजी काकडे, प्रदेश सरचिटणिस किसान मोर्चा भाजपा वासुदेव काळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दिलीप खैरे, राहुल तावरे पाटील, सरपंच वर्षा तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकुले व ग्रामस्थ उपस्थित होते.
गुरूची विद्या गुरूलाच...
४विरोधी पक्षात असताना हर्षवर्धन पाटलांविषयी बापट यांनी गमतीजमती सांगत संसदीय मंत्र्यांकडे संसदीयव्यतिरिक्तही एक अदृश्य खाते असते त्याला फोडाफोडीचे खात म्हटले जाते आणि फोडाफोडी कशी करायची, हे तुमच्याकडून शिकलो. त्यामुळे गुरूची
विद्या गुरुलाच मिळणार, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना राजकीय शुभेच्छा देत विरोधात असाल तरी प्रेम वाटले पाहिजे.
...बारामतीला
अदृश्य कॅनाॉलद्वारे पाणी मिळते
1बारामतीमधून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिळविणे म्हणजे सोपे नाही. चंद्रराव तावरे यांनी पालकमंत्र्यांना बंद पाईपने पाणी सोडण्याची मागणी केली. या वेळी पालकमंत्री म्हणाले, की धरणातून येणार पिण्याचे पाणी बंद पाईपद्वारेच यावे, याला माझा पाठिंबा आहे. तर, धरणातून निघालेले पाणी बारामती व्हाया इंदापूरला कसे पोहोचेल, हीपण काळजी घेतली पाहिजे, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.
2यावर बापट म्हणाले, की बंद पाईपने पाणी मिळणे गरजेचे आहे. याने शेतकºयांना फायदा होईल. पुण्यातून बारामती, दौंड, इंदापूरला पाणी मिळते; परंतु बारामतीला एक अदृश्य कॅनॉल आहे. त्यातून बारामतीला पाणी मिळतेच मिळते. त्यांनी काय करून ठेवलंय काय माहीत? असा टोला पालकमंत्र्यांनी लगावला.