Uddhav Thackeray: ...आम्हीही नको ती अंडी उबवली अन् त्याच पुढं काय झालं तुम्हीही बघत आहात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:14 PM2021-11-02T19:14:13+5:302021-11-02T19:14:29+5:30

बारामतीत इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी भाजप - शिवसेना युतीवर केले भाष्य

In baramati, uddhav thackeray commented on the BJP Shiv Sena alliance | Uddhav Thackeray: ...आम्हीही नको ती अंडी उबवली अन् त्याच पुढं काय झालं तुम्हीही बघत आहात

Uddhav Thackeray: ...आम्हीही नको ती अंडी उबवली अन् त्याच पुढं काय झालं तुम्हीही बघत आहात

Next

बारामती : ‘‘राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. २५ ते ३० वर्ष आम्हीसुद्धा ते उघडले होते. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचे पुढे काय झाले ते तुम्ही बघत आहात,’’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप - सेना युतीवर भाष्य केले.

येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या अटल इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, राजकारणात टीकाकार असतात. असलेच पाहिजेत. आम्हीही यांचे टीकाकार होतो. पवार साहेबांची आणि बाळासाहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारण असतं, पण ते चांगल्या कामात आणू नये. पाठिंबा देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये, असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला. ते अजूनही थांबायला तयार नाहीत. त्यांचे काम अविरत सुरू आहे. मी दुसऱ्यांदा बारामतीला आलो आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा शेतीचे प्रदर्शन पाहिले. आज देशातले सर्वांत मोठे इन्क्युबेशन सेंटर पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंब विकासाच्या ध्यासाने काम करतंय, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार परिवाराचे कौतुक केले.

माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, देशातील ८१ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरच्या आत जमीन आहे. त्यापैकी ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. ही शेती घर चालवू शकणार नाही. त्यासाठी शेतीपूरक व्यवसायावर भर देणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, गेल्या ५० वर्षांत या संस्थेने शिक्षण आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविली. आज उभारण्यात आलेल्या सेंटरच्या माध्यमातून युवकांमध्ये ज्ञान, विज्ञानाची आवड निर्माण होईल. त्यांच्यातील संशोधन वृत्ती वाढण्यास मदत होईल.

...पण धूर काढू नका

दिवाळी सुरू झाली आहे. काय काय जण म्हणतायत फटाके फुटणार आहेत, ठीक आहे. फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका. कारण कोरोना अजून गेला नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे नाव न घेता लगावला.

Web Title: In baramati, uddhav thackeray commented on the BJP Shiv Sena alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.