पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यास बारामती अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:14+5:302021-06-06T04:08:14+5:30

बारामती : शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. ...

Baramati unlocked if positivity rate decreases | पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यास बारामती अनलॉक

पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यास बारामती अनलॉक

googlenewsNext

बारामती : शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा. जर रुग्णसंख्या ५ टक्क्यांच्या आत आली तर आपल्याला पूर्णपणे निर्बंध शिथिल करता येतील, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादूभार्वाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या बारामती शहर व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहेत, परंतु हे प्रमाण समाधानकारक नाही. अजून काही प्रमाणात म्हणजेच रुग्णसंख्या कमी आल्याशिवाय बारामती तालुक्यातील निर्बंध शिथिल करता येणार नाहीत. जर गर्दी वाढत राहिली तर दिवसाआड एका बाजूची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. शासन व स्थानिक प्रशासन कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामग्री तसेच औषधे, ऑक्सिजनचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिस-या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

-----------------------

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कन्हेरी येथे उद्यानाचे भूमिपूजन

बारामती येथील कन्हेरी गावामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोरोना नियमांचे पालन करून वनविभागाकडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक पुणे राहुल पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी बारामती राहुल काळे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

-------------------------------

दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण... स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्यावतीने बारामती येथील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी एसबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग, महाव्यवस्थापक सुखविंदर कौर उपस्थित होते. तसेच मयूरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्यामार्फत १५ सॅनिटायझर व सुपे येथील ८५ निराधार, विधवा व दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी १००१ रुपयांचा धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मयूरेश्वर प्रतिष्ठानचे सुशांत जगताप व तुषार हिरवे उपस्थित होते. याचबरोबर मॅग्नम एंटरप्रायझेस यांच्याकडून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी काही औषधे व कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणा-या वैद्यकीय साधन सामग्री मदत म्हणून देण्यात आली. बारामती येथील हॉटेल डोसा प्लाझाचे योगेश भगवान पानसरे व दिनेश मोहन पानसरे यांच्याकडून देखील कोविड १९ साठी मदत म्हणून २५ हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कन्हेरी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन विभागाकडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून भूमिपूजन करण्यात आले.

०६०६२०२१-बारामती-०१

Web Title: Baramati unlocked if positivity rate decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.