बारामती महिला रुग्णालयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:47+5:302021-05-09T04:10:47+5:30
बारामती: कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी उद्योगासह सामाजिक संस्थेच्या वतीने महिला रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. ही रुग्णवाहिका शनिवारी ...
बारामती: कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी उद्योगासह सामाजिक संस्थेच्या वतीने महिला रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. ही रुग्णवाहिका शनिवारी (दि. ८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे सुपूर्त करण्यात आली.
बारामती परिसरातील आरोग्यसेवेला मदत करण्यासाठी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत डिमेक फाउंडेशन, पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि बारामती येथील केमिकल कंपनी (डिमेक)च्या वतीने सुसज्ज रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, एमआयडीसी उप अभियंता शुभम पाटील, डॉ. सदानंद काळे, डिमेक कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक युवराज काळे, उप महाप्रबंधक नीलेश आंदळकर, संभाजी होळकर, उद्योजक सचिन सातव, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज चे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल डिमेक नातू फाउंडेशन व डिमेक कंपनीच्या चेअरमन प्रभा नातू व डिमेक कंपनी उपाध्यक्ष नागेश कोरे यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
बारामती महिला रुग्णालयासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिका सुपूर्त करण्यात आली.
०८०५२०२१ बारामती—०३