बारामतीकरांनी अनुभवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:20+5:302021-06-24T04:09:20+5:30
बारामती: बारामतीकरांनी बुधवारी (दि. २३) सप्तरंगी कोंदणातील सूर्य अनुभवला. अनेकांनी प्रथमच हा अनुभव घेतल्याने दिवसभर हा सूर्य सोशल ...
बारामती: बारामतीकरांनी बुधवारी (दि. २३) सप्तरंगी कोंदणातील सूर्य अनुभवला. अनेकांनी प्रथमच हा अनुभव घेतल्याने दिवसभर हा सूर्य सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पावसातील इंद्रधनुष्य अनेकवेळा पाहिले आहे. हे इंद्रधनुष्य पाहणे म्हणजे सुखद अनुभव असतो. केवळ पावसाळ्यात हे इंद्रधनुष्य पाहता येते. मात्र, इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंगात गुंफलेला सूर्य पाहून बारामतीकर आनंदी झाले होते. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आकाशात सूर्याभोवती सप्तरंगातील कडे निर्माण झाले. या वेळी अनेकांना या सूर्याचे छायाचित्रण करण्याचा मोह आवरला नाही. असे दृष्य पाहताना आनंददायी अनुभव असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, याबाबतचे अनेकांच्या मनातील प्रश्नचिन्ह कायम होते. बारामतीत आज दुपारी सूर्य प्रखर व आकाशात ढग होते. मात्र, सूर्याभोवती मात्र काही काळ अजिबातच ढग नव्हते व याच काळात सप्तरंगीकडे पडले होते.
शहर व परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास सूर्याभोवती सप्तरंगी खळे पडले होते. सन हलो याचा हा प्रकार असल्याचे काही खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितले. काही जणांनी पावसाळ्यातील इंद्रधनुष्य तर, याला ब्रम्हधनुष्याचेही नाव देण्याची मजल गाठली. दुपारी सूर्याभोवती हे तेजोमय सप्तरंगी खळे काही जणांना दिसल्यानंतर फोनाफोनी सुरू झाली. याबाबत माहिती झाल्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून या घटनेचे छायाचित्रण केले. अनेकांना आयुष्यात पहिल्यांदाच असा सूर्याभोवतीचे गोलाकार सप्तरंगी कडे पाहण्याचा अनुभव घेत असल्याचे सांगितले. सूर्याभोवतीचे गोलाकार तेजोवलय म्हणजे २२ अंशांचे खळे अनेक शहरात या पूर्वीही पाहिले गेल्याची चर्चा होती.
बारामतीत सूर्याभोवती सप्तरंगी खळे पडले.
२३०६२०२१-बारामती-२०
२३०६२०२१-बारामती-२१
२३०६२०२१-बारामती-२२