बारामतीचा चेहरा मोहरा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:18+5:302021-02-26T04:16:18+5:30

१०१ रुपयांचे शिल्लकीच्या अंदाजपत्रकालाही मंजुरी देण्यात आली. कोणतिही करवाढ, दरवाढ नसलेल्या या बजेटमध्ये बारामतीकरांवर विविध ...

Baramati's face will change | बारामतीचा चेहरा मोहरा बदलणार

बारामतीचा चेहरा मोहरा बदलणार

Next

१०१ रुपयांचे शिल्लकीच्या अंदाजपत्रकालाही मंजुरी देण्यात आली. कोणतिही करवाढ, दरवाढ नसलेल्या या

बजेटमध्ये बारामतीकरांवर विविध प्रकल्पांचा अक्षरश: वर्षाव करण्यात आला आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन याबाबत बैठक पार पडली. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली. बृहन्महाराष्ट्र पाणी योजना, शिवसृष्टी, नीरा डावा कालवा सुशोभीकरण, सिटी सेंट्रल पार्क, कऱ्हा नदी सुशोभीकरण आदी प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. यंदा घरपट्टी व पाणीपट्टीसह जागाभाड्यांची थकबाकी ४५ कोटी रुपयांवर पोहोचली असली तरी विकासकामांवर याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले गेले.

एमआयडीसीतील कल्याणीपासून निघणाऱ्या बायपासला जोडणाऱ्या रस्त्यासाठी यंदा तरतूद करण्यात आली आहे. कोर्ट कॉर्नर ते पेन्सिल चौक रस्त्याच्या मधल्या जागेचे सुशोभीकरण, विद्या प्रतिष्ठानच्या चारही बाजूने जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी हद्दवाढीत जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच, जुन्या गावठाणातील साडेचार किमी वाहिन्यांना गंज पकडला आहे, त्या खराब झाल्या आहेत. येथील मेन रायझिंग पाईपलाईन शंभर टक्के बदलण्यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय महिला बालकल्याण, अपंग कल्याण, झोपडपट्टी निर्मूलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील लाभार्थ्यांच्या हिश्श्यासाठी दोन कोटींची तरतूद, झोपडपट्टी निर्मूलन योजनेत पायाभूत सुविधांसाठी १५ कोटी, सर्व्हे

क्रमांक २२० मधील उद्योगभवनासाठी ५ कोटी, जुनी भाजी मंडई उद्योगभवनासाठी १५ कोटी, वसंतराव पवार नाट्यगृह नूतनीकरणासाठी १५ कोटी, मुस्लिम समाज दफनभूमी, ईदगाह मैदान, उर्दू शाळा, सामाजिक सभागृहासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील जुने गावठाण रस्ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी २५ कोटीं खर्च करण्यात येणार आहेत.

पाटस रस्ता ते मोरगाव रस्ता ते नीरा रस्ता ते फलटण रस्ता या नव्या बाह्यवळण रस्त्यासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. सीएसआरमधून तांदुळवाडी, जळोची, सेंट्रल बिल्डिंग परिसर, नीरा रस्ता येथे

उद्यान विकसित करण्यात येणार आहेत. याशिवाय ३ नवीन सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा स्वच्छ सुंदर बारामती शहर निर्मितीवर अधिक भर दिला असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक गुजर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार व एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे शहराच्या

विकासात महत्वपूर्ण योगदान असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक गुजर यांंनी नमुद

केले.

———————————————

...बारामतीकरांची सहा महिने पाण्याची गरज भागणार

बारामती शहरात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी चार साठवण तलाव आहेत.या चार तलावांशिवाय आणखी दोन साठवण तलाव बांधण्यात येणार आहेत. गौतमबाग तांदुळवाडी येथे १४५ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे दोन नवीन साठवण तलावासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली. हे तलाव पूर्ण झाल्यास नीरा डावा कालवा बंद झाल्यानंतर देखील बारामतीकरांची सहा महिने पिण्याचे पाण्याची गरज भागणार आहे.

Web Title: Baramati's face will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.