पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्राला काटेरी कुंपण, रुग्णांना नाहक त्रास सहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:11+5:302021-09-04T04:15:11+5:30

पाणी पिण्याची सोय नाही, आजूबाजूस लाईटची व्यवस्था नाही, रुग्णालयाला कंपाउंडच्या संरक्षण भिंतीची सोय नाही. हजारो नागरिकांचे जीवन पिंपरी ...

Barbed wire fence to Pimpri Budruk Health Center, patients suffer unnecessarily | पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्राला काटेरी कुंपण, रुग्णांना नाहक त्रास सहन

पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्राला काटेरी कुंपण, रुग्णांना नाहक त्रास सहन

Next

पाणी पिण्याची सोय नाही, आजूबाजूस लाईटची व्यवस्था नाही, रुग्णालयाला कंपाउंडच्या संरक्षण भिंतीची सोय नाही. हजारो नागरिकांचे जीवन पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्रावर अवलंबून असल्याने अनेक सुविधांपसून हे केंद्र वंचित आहे. एकीकडे कोरोना रोगाचे महाभयंकर संकट असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. बावडा व इंदापूर येथील आरोग्य अधिकारी पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य केंद्राकडे लक्ष देतील का असा सवाल या भागात ग्रामस्थ करीत आहे. आरोग्य केंद्राच्या बाजूला जंगलाप्रमाणे काटेरी झाडे असल्यामुळे मुख्य प्राणी, जनावरे, साप यासारख्या प्राण्यांचा सुळसुळाट असल्याने पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्रामध्ये राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्याला यापासून स्वतःचा जीव धोक्यात ठेवून कामाची हजेरी लावून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी बुद्रुकचे माजी सरपंच श्रीकांत बोडके हे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मदत घेऊन आरोग्य केंद्राला आलेल्या अडचणी सोडवतील का याकडे सर्वच ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.

पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य केंद्राच्या बाजूस असलेल्या काटेरी झुडपामुळे रुग्णांना लस घेण्यासाठी करावी लागत असलेली कसरत.

Web Title: Barbed wire fence to Pimpri Budruk Health Center, patients suffer unnecessarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.