लाचखोर महिला कर्मचारी अटकेत
By admin | Published: June 1, 2017 02:34 AM2017-06-01T02:34:21+5:302017-06-01T02:34:21+5:30
पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी एका व्यक्तीकडून हजार रुपयांची लाच घेताना विमानतळ पोलीस ठाण्याच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी एका व्यक्तीकडून हजार रुपयांची लाच घेताना विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्याला बुधवारी पकडण्यात आले.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका अभिजित वाघ (रा. बढे वस्ती, मुंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यासंदर्भात पोलिसांकडून व्हेरिफिकेशनसाठी त्यांना पोलीस ठाण्याला बोलाविण्यात आले. त्या वेळी वाघ हिने पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा अहवाल अनुकूल व लवकर देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
केली. विभागाने याबाबत पडताळणी केली. त्या वेळी एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात बुधवारी सापळा रचण्यात आला. वाघ हिला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.