लाचखोर महिला वनरक्षक जेरबंद
By admin | Published: December 22, 2016 02:42 AM2016-12-22T02:42:49+5:302016-12-22T02:42:49+5:30
बेकायदेशीररीत्या झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जुन्नर वन परिक्षेत्र कार्यालयातील
जुन्नर : बेकायदेशीररीत्या झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जुन्नर वन परिक्षेत्र कार्यालयातील महिला वनरक्षक वैशाली देविदास तांबारे (वय २६) यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
बुधवारी सकाळा हा प्रकार घडला. लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने वनविभागात खळबळ उडाली. याबाबत घडलेली घटना अशी : बेकायदेशीररीत्या झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आदिवासी भागातील एका तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे करण्यात आली होती. तडजोडीपोटी ७ हजार रुपये देण्याची मागणी आरोपी तांबारे यांनी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पुणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात लाच स्वीकारताना तांबारे रंगेहाथ पकडल्या गेल्या. जुन्नर वनविभागाच्या मुख्य कार्यालयाच्या मागे असणाऱ्या बैलबाजाराच्या आवारात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.