बऱ्हाटे, जैनची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:55+5:302021-07-21T04:09:55+5:30
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) दाखल गुन्ह्यात अटक केलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि ...
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) दाखल गुन्ह्यात अटक केलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि कथित पत्रकार देवेंद्र जैन याला कोर्टाने दि. २ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. खंडणी, फसवणूक असे विविध गुन्हे बऱ्हाटेच्या नावावर आहेत. त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने ब-हाटे आणि जैनला कोर्टात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केली. मात्र, त्यावर विशेष मोक्का न्यायाधीशांनी पोलिसांचा अधिकार कायम ठेवून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
----------------------------------------------