बसथांबा एकीकडे; प्रवासी दुसरीकडे

By admin | Published: October 15, 2015 12:49 AM2015-10-15T00:49:39+5:302015-10-15T00:49:39+5:30

‘जखम पायाला अन् पट्टी डोक्याला’ बहुतांश एसटी थांब्यांची अवस्था अशीच आहे. बारामती-मोरगाव-पुणे राज्य रस्त्यावरील लोणी पाटीवरील बसथांबा एकीकडे, तर प्रवासी दुसरीकडे

Basathamba on one hand; Traveler on the other hand | बसथांबा एकीकडे; प्रवासी दुसरीकडे

बसथांबा एकीकडे; प्रवासी दुसरीकडे

Next

लोणी भापकर : ‘जखम पायाला अन् पट्टी डोक्याला’ बहुतांश एसटी थांब्यांची अवस्था अशीच आहे. बारामती-मोरगाव-पुणे राज्य रस्त्यावरील लोणी पाटीवरील बसथांबा एकीकडे, तर प्रवासी दुसरीकडे. या बसथांब्याची असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, थंडी असे बारमाही येथील प्रवासी भर रस्त्यावरच एसटीची प्रतीक्षा करताना दिसतात.
लोणी पाटी येथे बारामती-पुणे मार्गाला शिरूर, सुपा, सांगवी, फलटणला जाणारा जवळचा मार्ग झाला आहे. येथे चौफुला तयार झाला आहे. बारामतीहून पुण्याकडे ये-जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने दोन्ही ठिकाणी सतत वर्दळ सुरू असते, तर शिरूर-चौफुला-सुपा येथील फलटणकडे जाणारी वाहनांची वर्दळही सतत सुरू असते. याशिवाय बारामती-जेजुरी-बारामती ही एसटीची शटलसेवा अर्ध्या तासाला सुरू असल्याने लोणी पाटी चौफुला सतत गजबजलेला असतो. या चौफुल्याच्या पश्चिमेला एसटीशेड आहे; मात्र आधी प्रवासी तर आधी एसटी थांबते, या गदारोळात दोघेही बसथांबा सोडून भरचौकातच थांबतात. त्यामुळे एसटी थांबण्याचे ठिकाण बसथांब्याऐवजी चौक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी बस पकडण्यासाठी रोजचीच धावपळ करावी लागते.
याच ठिकाणी चारही बाजूने वाहने ये-जा करीत असल्याने वाहतूककोंडी ही नित्याची झाली आहे, तर लहान-मोठे अपघातही होण्याची शक्यता प्रवासी बोलून दाखवितात.

Web Title: Basathamba on one hand; Traveler on the other hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.