अंबोलीतील केटी बंधाऱ्याने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 02:52 AM2018-12-09T02:52:35+5:302018-12-09T02:52:46+5:30

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

The base reached by the Kandi bundh of Amboli | अंबोलीतील केटी बंधाऱ्याने गाठला तळ

अंबोलीतील केटी बंधाऱ्याने गाठला तळ

Next

पाईट : अंबोली (ता. खेड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अंबोली (ता. खेड) येथे १९९२ मध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी स्थिती पाहता भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा बांधण्यात आला. सुरुवातीच्या ५ ते ६ वर्षांत यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. यामुळे परिसरातील अंबोली, विन्हाम, खरवली, कोहिंडे या चार गावांचा बारमाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली होती. बंधाºयामध्ये साठवणूक होत असलेल्या पाण्याने १०० हेक्टर जमीन पाण्याखाली येण्यास मदत झाली होती.

सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती उद्भवली असताना पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले. याचा या चार गावांना चांगलाच फटका बसणार आहे.
याबाबत ग्रामपंचायत सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या बाबत येथील सरपंच लक्ष्मण शिंदे म्हणाले, आम्ही या बाबत अनेक पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे केला आहे. अंबोली आणि परिसरातील गावांना कायमस्वरूपी दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासठी हा बंधारा एकमेव साधन आहे. परंतु पाटबंधारे विभाग त्याकडे कानाडोळ करत आहे.

चासकमान पाटबंधारे विभागाअंतर्गत भामा आसखेड सिंचन विभाग करंजविहिरे यांच्या आखत्यारित हा बंधारा येतो. मात्र, गेल्या १० वर्षांपासून बंधाºयातून पाण्याची गळती होत असल्याने बंधाºयात पाणी साचत नाही. या सोबतच बंधाºयाचे ढापेही कुजले आहेत. या वर्षी ढापेही बसविण्यात आले नाही. यामुळे बंधाºयामध्ये पाणी साचले नाही.

Web Title: The base reached by the Kandi bundh of Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.