बेसिक पोलिसिंग, तंत्रज्ञानाच्या वापरावर देणार भर,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  यांचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 02:23 PM2020-09-20T14:23:27+5:302020-09-20T14:24:04+5:30

पुणे हे सुंदर शहर आहे. सांस्कृतिक राजधानी असलेले हे शहर आता आयटीचे हबही झाले आहे. अशा शहरात काम करण्यासाठी संधी मिळणे, ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.

Basic policing, emphasis on use of technology, statement of Police Commissioner Amitabh Gupta | बेसिक पोलिसिंग, तंत्रज्ञानाच्या वापरावर देणार भर,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  यांचे विधान 

बेसिक पोलिसिंग, तंत्रज्ञानाच्या वापरावर देणार भर,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  यांचे विधान 

Next

पुणे - पुण्यात काम करताना आपण बेसिक पोलिसिंग आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणार आहे. पुण्यासारख्या शहरात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे सौभाग्य समजतो, असे नूतन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.  मावळते पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून रविवारी अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ते ‘लोकमत’ शी बोलत होते.  

गुप्ता म्हणाले, पुणे हे सुंदर शहर आहे. सांस्कृतिक राजधानी असलेले हे शहर आता आयटीचे हबही झाले आहे. अशा शहरात काम करण्यासाठी संधी मिळणे, हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. डॉ. व्यंकटेशम यांनी सुरु केलेले सर्व डायनामिक उपक्रम यापुढेही सुरु राहतील. त्यात आणखी भर टाकली जाईल. शहरातील कायदा सुव्यवस्था आबादी राखण्यासाठी बेसिक पोलिसिंग राबविण्याचा आपला विचार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या कामात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, याकडे आपले लक्ष असणार आहे. चांगल्या कामाला पुणेकर नेहमीच साथ देतात. आतापर्यंत पुणेकरांनी जसे पोलिसांना नेहमीच सहकार्य केले, तशीच अपेक्षा यापुढील काळातही पुणेकरांचे सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे. पुढील चार पाच दिवस पुणे व पुणे पोलीस दलातील विविध घटकांचा अभ्यास करुन प्रथम आपण सर्व माहिती घेणार असून त्यानंतर कामाची रुपरेषा निश्चित करणार आहे. सर्व माहिती घेतल्यानंतरच अधिक बोलणे योग्य होईल, असे त्यांनी सांगितले. 

अमिताभ गुप्ता हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील मुळचे राहणार आहेत. लखनौमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कानपूरच्या आयआयटीमधून बी. टेक मध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची आयपीएस केडरमध्ये १९९२ मध्ये निवड झाली. तरुण वयात आपल्याला नेमके काय व्हायचे, हे नक्की होत नाही. तेव्हापासून आपल्याला पोलीस सेवेचे आकर्षण होते, असे त्यांनी सांगितले.
पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन माहिती घेतली.

Web Title: Basic policing, emphasis on use of technology, statement of Police Commissioner Amitabh Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.