आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग ट्रस्ट’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:41+5:302021-09-13T04:10:41+5:30

सामाजिक कार्यकर्त्या अर्णवाज दमानिया यांनी मानसिक आरोग्यात, विशेष करून आत्महत्या प्रतिबंधाचे काम करण्यासाठी २००५ मध्ये 'कनेक्टिंग ट्रस्ट' या स्वयंसेवी ...

The basis of 'Connecting Trust' for those who think of suicide | आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग ट्रस्ट’चा आधार

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग ट्रस्ट’चा आधार

Next

सामाजिक कार्यकर्त्या अर्णवाज दमानिया यांनी मानसिक आरोग्यात, विशेष करून आत्महत्या प्रतिबंधाचे काम करण्यासाठी २००५ मध्ये 'कनेक्टिंग ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. गेल्या दीड वर्षात कोरोनाने अनेकांच्या जवळची जिवाभावाची माणसे हिरावून नेली. अनेकांचे रोजगार हिरावले; उद्योगधंदे ठप्प झाले. बेरोजगारांच्या संख्येत भर पडली. शाळा-कॉलेज बंद असल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. औषधोपचारांमुळे अनेक जण कर्जबाजारी झाले. लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम यामुळे कौटुंबिक ताणतणाव वाढले असून, त्याचे पर्यवसन टोकाचे नैराश्य, हतबलता आणि अपराधीपणाची भावना येत आहे. यातून बाहेर येण्यासाठी सकारात्मकता पेरण्याचे काम कनेक्टिंग ट्रस्ट करत आहे. विनामूल्य हेल्पलाइनद्वारे आजवर अनेकांशी संवाद करत त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

संस्थेतर्फे सप्टेंबर २०२० पासून स्वयंसेवकांनी फोनद्वारे आत्महत्या अनुभवलेल्या जवळपास २०० व्यक्तींपर्यंत पोचून त्यांना भावनिक आधार दिला. पियर एज्युकेटर प्रोग्राममध्ये ऑनलाइन स्वरूपात तीन शाळांच्या माध्यमातून ९२० विद्यार्थी, १७८ पालक आणि १२० शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यातून १६० विद्यार्थी पियर एज्युकेटर म्हणून त्यांच्या मित्रांना भावनिक आधार देण्यास तयार झाले. जनजागृती कार्यक्रमातून २९७६ लोकांपर्यंत आत्महत्या आणि तणावाच्या परिस्थितीत स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले.

-------------

एक जीवन वाचवणे खूप समाधान देऊन जाते. बऱ्याच लोकांना आधाराची गरज असते. आपण सर्वांनी एकमेकांना आधार देत जीवन वाचवण्याचा प्रयत्न करूया. त्रासात, वैफल्यात असलेल्या लोकांना भावनिक आधार देण्यासाठी किंवा आत्महत्येविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी संवेदनशील आणि धैर्य असलेल्या लोकांची गरज असते. असे लोक एकत्र आले, एकमेकांशी 'कनेक्ट' झाले, तर अनेकांना आपण आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो.

- विक्रमसिंह पवार, कनेक्टिंग ट्रस्ट

Web Title: The basis of 'Connecting Trust' for those who think of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.