कोपरी व्यवसायातून मिळविला जगण्याचा आधार

By admin | Published: February 18, 2017 02:57 AM2017-02-18T02:57:12+5:302017-02-18T02:57:12+5:30

ग्रामीण भागातील शेतकरी, मेंढपाळ यांची गरज ओळखून त्यांना आवश्यक असणारी कोपरी व्यवसायाची निवड रुई (ता. इंदापूर) गावातील काहींनी केली.

The basis of survival of the Kopri business | कोपरी व्यवसायातून मिळविला जगण्याचा आधार

कोपरी व्यवसायातून मिळविला जगण्याचा आधार

Next

सतीश सांगळे / कळस
ग्रामीण भागातील शेतकरी, मेंढपाळ यांची गरज ओळखून त्यांना आवश्यक असणारी कोपरी व्यवसायाची निवड रुई (ता. इंदापूर) गावातील काहींनी केली. या व्यवसायाला बाबीर यात्रेत मिळालेली प्रसिद्धी आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. कोपरी वापरणारा एक वेगळा ग्राहक असल्याने याची मागणी अखंडपणे राहणार आहे. वर्षभरात या व्यवसायाच्या माध्यमातून गृहिणींनी लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.
सुमारे तीन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले रुई हे गाव आहे. खडकवासला कालव्याच्या पाण्यामुळे जिराईत जमिनीचे बागायत जमिनीत रूपांतर झाले. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून येथील ग्रामस्थ स्थिरावले आहेत. कधीकाळी गावातील नागरिक रोजगारासाठी गावोगावी भटकंती करत असत, त्या काळातही येथील काहींनी आपला स्वत:च्या व्यवसायास प्राधान्य दिले.
कोपरी शिलाईकाम करणाऱ्या व्यावसायिकांची सुमारे २० कुटुंबे आहेत. मुंबई, दिल्ली येथून परदेशी जुने कपडे किलोप्रमाणे खरेदी करुन त्यापासून कोपरी शिलाई करण्याचे काम येथे केले जाते. या कामाचा मोठा आधार येथील गृहिणींना मिळाला आहे. येथील बाळू मारकड व काही जणांकडून हा व्यवसाय चालविला जात आहे. मुंबई, दिल्ली येथून परदेशातून आलेले नायलॉन, पॉलिस्टर सुताचे जुने कपडे खरेदी करुन त्यापासून कोपऱ्या शिवण्याचे काम करण्यात येते. ३० ते ४० रुपये प्रतिकिलो या दराने हे कपडे खरेदी केले जातात. त्यापासून टिकाऊ व मजबूत कोपऱ्या शिवण्याचे काम करणारी येथे सुमारे २० कुटुंबे आहेत. या कोपऱ्यांना ग्रामीण भागातील शेतकरी व मेंढपाळवगार्तून मागणी टिकून आहे.

दुष्काळी परिस्थितीत आर्थिक आधार
४गावातील काही कापलेले कापड व धागा त्या शिलाई करणाऱ्या महिलांना देऊन त्यांना प्रतिकोपरी काही मोबदला दिला जात आहे. त्यामुळे सध्या या महिला दिवसाकाठी पंधरा ते वीस कोपऱ्या शिवत आहेत. केवळ कोपरीच्या उलाढालीचा विचार केल्यास वर्षभरात तीस लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल येथे होते. गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही कोपरीच्या माध्यमातून या महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.
४सध्या सुरू होणाऱ्या यात्रा-जत्रांच्या हंगामात अशा कोपऱ्यांना अधिक मागणी असते. शिवाय वर्षभर भरणारे बैलबाजार, शेळ्यामेंढ्यांच्या बाजारातही कोपऱ्या विक्रेत्यांची दुकाने पाहायला मिळतात. मजबूत कापड, प्रशस्त व अधिक खिसे यामुळे कोपऱ्या वापरणारा वेगळा ग्राहकवर्ग आहे.
४सध्या ग्राहकांची ही पसंती ओळखून या व्यावसायिकांनी रंगीबेरंगी कोपऱ्या शिवण्यास प्राधान्य दिले आहे. ग्राहकांकडून या रंगीत
कोपऱ्यांना मागणी आहे.

Web Title: The basis of survival of the Kopri business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.