लोणावळ्यात पर्यटनबंदी आदेशाला 'केराची टोपली' ; शनिवार व रविवारी पर्यटकांची तुडूंब गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 11:39 AM2020-10-05T11:39:48+5:302020-10-05T11:40:35+5:30

लोणावळयातील आल्हाददायक वातावरण व दरीमधून अलगदपणे वाहणारे धुके हा नजारा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात... 

'basket' to Lonavla tourism ban order; Crowds of tourists on weekends | लोणावळ्यात पर्यटनबंदी आदेशाला 'केराची टोपली' ; शनिवार व रविवारी पर्यटकांची तुडूंब गर्दी

लोणावळ्यात पर्यटनबंदी आदेशाला 'केराची टोपली' ; शनिवार व रविवारी पर्यटकांची तुडूंब गर्दी

Next
ठळक मुद्देलायन्स पॉईट व शिवलिंग पॉईट तसेच गिधाढ तलाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोणावळा : लोणावळा व मावळ तालुक्यात पुणे जिल्हा‍धिकारी यांनी पर्यटनबंदीचा आदेश लागू केला असला तरी या आदेशाला केराची टोपली दाखवत शनिवार व रविवारी लोणावळयात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाच्या निवेदनानंतर लोणावळा शहर पोलिसांनी भुशी धरण व लायन्स पॉईटकडे जाणाऱ्या मार्गावरील चेकपोस्ट नाके बंद केल्याने भुशी धरण व लायन्स पॉईटकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांचा मुक्तसंचार पहायला मिळाला. पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांनी बंदी असली तरी रस्त्यावरून जाता येत असल्याने किमान भुशी धरण व लायन्स पॉईट दूरून का होईना पहाता यावा याकरिता पर्यटकांनी त्यांच्या वाहनांचा ताफा त्या परिसरात वळविल्याने लायन्स पॉईट व शिवलिंग पॉईट तसेच गिधाढ तलाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

लोणावळयातील आल्हाददायक वातावरण व दरीमधून अलगदपणे वाहणारे धुके हा नजारा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. 

    यावर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर लोणावळा व मावळ परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बजावले होते. या आदेशांनुसार लोणावळा शहर व ग्रामीण पोलीसांनी मागील चार महिन्यांपासून या आदेशाचे पालन करत पर्यटकांना पर्यटनस्थळ परिसरात जाण्याच मज्जाव केला होता.

अनलॉक चार मध्ये केंद्र व राज्य शासनाने नागरिकांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास परवानगी दिल्याने तसेच पासची अट रद्द केल्याने नागरिक एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ लागले आहेत. यामुळे पर्यटनबंदी असली तरी नागरिकांना व पर्यटकांना बिनधिक्कतपणे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर जाणे शक्य झाल्याने 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या सुट्टीला जोडून आलेल्या शनिवार व रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधत पर्यटक मोठया संख्येने लोणावळयात दाखल झाले होते. यामुळे शहरातील सर्व रस्ते, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, सहारा पुल व लायन्स पॉईट परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. खंडाळा परिसरात देखील पर्यटक वाहनांची व पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. तुंगार्ली धरण परिसर, पवनाधरणाचा परिसर याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने स्थानिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. लोणावळा शहराला व परिसराला कोरोनामुक्त करण्यासाठी स्थानिक नागरिक नियमांचे पालन करत असताना पर्यटकांची गर्दी मात्र कोरोनाला आमंत्रण देणारी ठरणार असल्याने प्रशासनाने यावर कडक नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: 'basket' to Lonavla tourism ban order; Crowds of tourists on weekends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.