पालिका दवाखान्यासाठी बावधनकरांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:44+5:302021-03-08T04:10:44+5:30

कर्वेनगर - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, कोरोनाची लस आता आलेली आहे. ही लस बावधन येथील नागरिकांना हवी ...

Bavdhankar's ploy for municipal hospital | पालिका दवाखान्यासाठी बावधनकरांची फरपट

पालिका दवाखान्यासाठी बावधनकरांची फरपट

Next

कर्वेनगर - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, कोरोनाची लस आता आलेली आहे. ही लस बावधन येथील नागरिकांना हवी आहे. त्यासाठी बावधनमध्ये महापालिका दवाखाना सुरू करावा आणि तिथे लस देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

बावधन परिसरात शासकीय आरोग्य सुुविधा किंवा पालिका दवाखाना नसल्यामुळे बावधनकरांची आरोग्य सुविधेसाठी फरपट होत असल्याचा आरोप खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कुणाल वेडेपाटील यांनी केला आहे.

प्रभाग १० मध्ये अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी फक्त चमकोगिरी करताना दिसत असून, नागरिकांचा अनेक सुविधेपासून वंचित आहेत.

शासकीय आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना औंध किंवा कोथरूडमध्ये जावे लागत आहे. साधारण हे चार-पाच किलोमीटर अंतर असल्याने नागरिक जाण्यासाठी धजावत नाही किंवा दळणवळण सुविधा नसल्यामुळे जात नाहीत. तरी बावधनमध्ये ओपीडी आणि हॉस्पिटलची योग्य जागा पाहून तातडीने लसीकरण आणि विविध तपासण्या सुरु करण्याची मागणी बावधनकरांंनी केली आहे.

---------------------

बावधनकरांसाठी आरोग्यबाबत लोकप्रतिनिधी संवेदनशील नसून चमकोगिरीमध्ये त्यांना रस आहे, मूलभूत सुविधांची कमतरता नियमित भासत आहे.

- कुणाल वेडेपाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला, --------------------

बावधनमध्ये ओपीडीचे काम तातडीने चालू करणार असून, मोठ्या हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नागरिकांना लवकरच कोरोना लसीकरणासह शासकीय सुविधांंचा लाभ मिळणार आहे.

- दिलीप वेडेपाटील स्थानिक नगरसेवक

-------------

Web Title: Bavdhankar's ploy for municipal hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.