बावडा खून प्रकरणातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:47+5:302021-06-17T04:07:47+5:30

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई बारामती: इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडलेल्या खून प्रकरणातील फरारी असलेल्या दोघांना पुण्याच्या स्थानिक गुन्हे ...

In the Bawada murder case | बावडा खून प्रकरणातील

बावडा खून प्रकरणातील

Next

स्थानिक गुन्हे अन्वेषण

विभागाची कारवाई

बारामती: इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडलेल्या खून प्रकरणातील फरारी असलेल्या दोघांना पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (दि. १५) अकलूज येथून ताब्यात घेतले. १७ जानेवारी रोजी संजय महादेव गोरवे याचा संगनमताने खून करून त्याचे हात, पाय आणि डोके कापून भीमा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकरणात याआधीच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र दोघे जण फरारी होते.

बावडा येथे १७ जानेवारी रोजी दादा कांबळे याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून मंजूषा महादेव गोरवे (वय ५१, रा. टाकळी, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) यांचा मुलगा संजय महादेव गोरवे यास त्याचे मित्र लकी विजय भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्या मध्यस्थीने बोलावून घेतले. या वेळी कुटुंबातील सरूबाई, सुष्मिता व काजल यांच्याशी संजय याची जवळीक संबंध असल्याचा संशय घेऊन, बावडा गणेशवाडी गावच्या हद्दीत संजय यास धारधार हत्याराने जिवे मारले. त्याचे दोन्ही हात, पाय व डोके कापून अज्ञात ठिकाणी फेकून दिले. तर धड भीमानदीच्या पात्रात ओळख पटू नये याकरीता फेकून दिला होते. अशी फिर्याद मंजूषा गोरवे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी ३ आरोपी अटक करण्यात आलेले होते. गुन्ह्यातील निष्पन्न असलेले उर्वरित दोघे आरोपी हे गुन्हा घडल्या पासून फरार होते. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. मंगळवारी (दि. १५) एलसीबी पथकास या गुन्ह्यातील फरार दोघे आरोपी हे अकलूज (जि.सोलापूर) येथे येणार असल्याची खबर मिळाली. त्यावरून पोलिसांनी अजय उर्फ प्रदीप प्रकाश खरात (वय २०), प्रमोद प्रताप खरात (वय २१, दोघे रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, जनार्दन शेळके, गुरु गायकवाड, अभिजित एकशिंगे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

-------------------------------

Web Title: In the Bawada murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.