सावधान, डिलीट करून माहिती होत नाही नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 05:07 AM2020-09-27T05:07:31+5:302020-09-27T05:07:39+5:30

बॉलीवुडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये व्हॉटसअ‍ॅप चॅटवरून अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. चॅट संपूर्ण डिलीट करूनही पोलीसांनी कसे मिळविले आणि हे पुरावे न्यायालयात ग्राह्य धरले जाणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

Be careful, deleting doesn't destroy the information | सावधान, डिलीट करून माहिती होत नाही नष्ट

सावधान, डिलीट करून माहिती होत नाही नष्ट

Next

विवेक भुसे ।

पुणे : मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून एखाद्याला मेसेज पाठवून ते डिलीट केले तरी त्याची मेमरी शिल्लक राहते. पोलीसांना फॉरेन्सिक लॅबमध्ये हे मेसेज पुन्हा काढता येऊ शकतात. संपूर्ण चॅट (संवाद) पुन्हा पाहिले जाऊ शकते. याबाबतचे फॉरेन्सिक लॅबने दिलेले प्रमाणपत्र न्यायालयातही ग्राह्य धरले जाते, अशी माहिती पोलीस तपासातील तज्ज्ञांनी दिली आहे.

बॉलीवुडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये व्हॉटसअ‍ॅप चॅटवरून अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. चॅट संपूर्ण डिलीट करूनही पोलीसांनी कसे मिळविले आणि हे पुरावे न्यायालयात ग्राह्य धरले जाणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरुन पाठविलेला किंवा मिळालेला मेसेज डिलिट केला तरी मोबाईलमध्ये मेमरी राहते. मेसेज पुन्हा रिकव्हर करता येतो. व्हॉटसअ‍ॅपसारख्या अ‍ॅपमध्ये पूर्ण सुरक्षितता असल्याचे सांगण्यात येते. परंतु, बहुसंख्य लोक आपले व्हॉटसअ‍ॅप मेसेज बॅकअप म्हणून सेव्ह करुन ठेवत असतात. आपोआप बॅकअप घेतला जात आहे हे आपल्या लक्षातही नसते. त्यामुळे फिर्यादी किंवा आरोपी यांचे मोबाईल हँडसेट ताब्यात घेतल्यावर फॉरेन्सिक लॅबमध्ये सॉफ्टवेअरचा वापर करुन हँडसेटमध्ये असलेले सर्व मेसेज पुन्हा रिकव्हर करता येतात. फॉरेन्सिक लॅबकडून या मेसेजबाबत एक सर्टिफिकेट दिले जाते. ते न्यायालयातही ग्राह्य धरले जाते.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हॉटसअपकडून स्थानिक पातळीवर एक वर्षापर्यंतचा डाटा उपलब्ध होऊ शकतो. फेसबुक, जी मेल या कंपन्यांकडून जसे सहकार्य मिळतेÞ तसे व्हॉटसअ‍ॅपकडून दिली जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने चॅटची माहिती रिकव्हर करुन घेण्यात येते.
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे तुम्ही एखादा मेसेज, फोटो दुसºयाला पाठविला तर त्याची नोंद कोठेतरी झालेली असते. त्यामुळे ते उपकरण पोलीसांना मिळाले तर त्यातून माहिती काढणे शक्य असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Be careful, deleting doesn't destroy the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.