टिंगल-टवाळी कराल तर खबरदार

By admin | Published: September 22, 2015 03:27 AM2015-09-22T03:27:59+5:302015-09-22T03:27:59+5:30

गणेशोत्सवातील गर्दी म्हणजे टिंगलटवाळीसाठी संधी असे कोणी समजत असेल तर खबरदार...असा इशारा तरुणीच देऊ लागल्या आहेत.

Be careful if you tinkle | टिंगल-टवाळी कराल तर खबरदार

टिंगल-टवाळी कराल तर खबरदार

Next

पुणे : गणेशोत्सवातील गर्दी म्हणजे टिंगलटवाळीसाठी संधी असे कोणी समजत असेल तर खबरदार...असा इशारा तरुणीच देऊ लागल्या आहेत. दुर्गावतार धारण करून टिंगल करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवू असे त्या म्हणायला लागल्या आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून गणेशभक्त येत असतात. यामध्ये महिलांची संख्याही मोठी असते. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात तरुणींच्या टिंगल-टवाळीचे गालबोट लागत होते. मात्र, ‘निर्भया’ प्रकरणानंतर तरुणींमध्ये आता प्रतिकाराची जिद्द निर्माण झाली असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये आढळून आले.
आरती कोकोटे आणि तिच्याबरोबरच्या चार युवती रात्री उशिरापर्यंत गणपती पाहत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही प्रत्येक वर्षी गणपती बघण्यासाठी येतो. अनेकदा आम्हाला वाईट अनुभव यायचे. काही टवाळ मुले गर्दीचा फायदा घेऊन अंगाला हात लावतात. नेमके कोणी हे कृत्य केले हे गर्दीमुळे समजायचे नाही. घरच्यांना सांगितले की तेही ओरडत. पुढील वर्षी गणपती पाहण्यास जायचे नाही असेही सांगितले जाते. परंतु आता आम्ही प्रतिकार करायला शिकलो आहे. कोणी छेडछाड काढली तर आम्ही त्या मुलांना थेट शिव्या देतो. त्यामुळे आसपासचे लोकही लगेच त्या मुलांकडे बघत असत. कल्याणीनगरच्या बीपीओमध्ये काम करणाऱ्या पाच तरुणींचा ग्रुप रात्री ड्युटी संपल्यावर गणपती पाहण्यासाठी आला होता. त्या म्हणाल्या, ‘‘कोणी छेड काढताना दिसला तर आम्ही थेट त्याला उत्तर देतो. पुण्याचे नागरिक संवेदनशील आहेत. मुलींबाबत काही घडत असेल तर ते थांबतातच, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत थांबण्यास भीती वाटत नाही.’’
पोलिसांकडून छेडछाडीच्या प्रकाराबाबत कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी काही भीतीदायक अवस्थेत बेलबाग चौकात पोहोचल्या. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास मंडपात बसलेल्या दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे म्हणून पुढे गेल्या. तेथे दोन पोलीस कॉन्स्टेबल गप्पा मारत उभे होते व त्यांच्या शेजारी एक पोलीस मित्र उभा होता. पोलिसांनी लक्ष दिले नाही मात्र, पोलीस मित्राने पुढे सरसावून काय झाले आहे अशी विचारपूस केली. मंडई चौकापासून काही टवाळखोर मुले आमचा पाठलाग करीत आहेत व काही अश्लील कॉमेंट पास करीत आहेत, असे सांगत असताना देखील शेजारी उभ्या असलेल्या महिला कॉन्स्टेबलने साधी विचारपूसदेखील केली नाही. पोलीस मित्रानेच प्रतिनिधींना धीर दिला. ती मुले तुम्हाला आजूबाजूला आता कुठे दिसत आहेत का, तुम्ही त्यांना ओळखू शकता का, ती मुले दिसताच आम्हाला फक्त इशाऱ्याने कळवा, आम्ही त्या मुलांचा बंदोबस्त करूव वेळ पडलीच तर आम्ही तुम्हाला घरी पोहोचवण्याचीदेखील व्यवस्था करू. त्या पोलीस मित्राने सांगितल्याप्रमाणे प्रतिनिधी समोरील चौकात १० ते १५ मिनिटे उभ्या राहिल्या. काही वेळाने त्याच ठिकाणी एक महिला कॉन्स्टेबल आली व प्रतिनिधींशी अरेरावी भाषेत संवाद साधण्यास तिने सुरुवात केली.

Web Title: Be careful if you tinkle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.