रवीभाऊ देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा; हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 01:21 PM2023-03-05T13:21:53+5:302023-03-05T13:22:07+5:30

कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा

Be careful when talking about Ravi Bhau Devendra dadanvis Hemant Rasane advice to ravindra dhangekar | रवीभाऊ देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा; हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

रवीभाऊ देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा; हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

googlenewsNext

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तब्बल ३० वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने सत्ता मिळवून इतिहास घडवला. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने सर्वत्र जल्लोषही केला. अशातच रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

लोकशाहीची हत्या कशी करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. देवेंद्र यांचं मत दुश्मनीच आहे. कालांतराने त्याचा यांना पश्चताप होणार आहे, दबावाचे राजकारण सुरु आहे. या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. असं धंगेकर म्हणाले होते. त्याला प्रतिउत्तर देत रवीभाऊ देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा असा सल्ला हेमंत रासनेंनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे. 

 रासने म्हणाले, रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन आहेच. आपण मा. देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व फडणवीस यांनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा. देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत.

म्हणून मला उपोषणाला बसावं लागलं 

निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यावरही चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस लोकंना भेटत होते. हे पोलिसांना माहीत असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र माझ्यावर गुन्हा दाखल होतो. यावरून असे स्पष्ट होते की, पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. मग आपण साधी माणसं कोणाकडे जाणार. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हुकूमशाही केली मग उपोषणाला बसावं लागलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले हे पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला माहित होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही दिली नाही उलट मलाच दिली असल्याचेही धंगेकर यांनी सांगितले होते. 

Web Title: Be careful when talking about Ravi Bhau Devendra dadanvis Hemant Rasane advice to ravindra dhangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.