सावधान! तुमच्यावर आहे लक्ष
By Admin | Published: March 30, 2016 02:15 AM2016-03-30T02:15:58+5:302016-03-30T02:15:58+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त मजकूर, छायाचित्रे टाकून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त मजकूर, छायाचित्रे टाकून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. यापुढे सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर राहणार असून, त्यासाठी ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग लॅब’ सुरू करण्यात आली आहे. ही लॅब २४ तास कार्यान्वित ठेवली जाणार आहे. दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या लॅबद्वारे आक्षेपार्ह ६५ लिंक डिलीट करण्यात आल्या आहेत.
सायबर विभागाच्या वतीने तयार केलेल्या या लॅबचे उद्घाटन मंगळवारी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या हस्ते झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, सायबर विभागाचे उपायुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, लॅब तयार करण्यात सहकार्य करणारे आयक्यूएसएस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेरॉल्ड डिकोस्टा या वेळी उपस्थित होते. फेसबुक, टिष्ट्वटर, यू ट्यूब यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात येणारे आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे, राजकीय, धार्मिक व सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात मजकूर टाकल्याने कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर या लॅबद्वारे विशेष
लक्ष ठेवण्यात येईल. शहरात होणारे
मोर्चे, धरणे, आंदोलने यांबाबत
आगाऊ माहिती घेण्यासाठीही या
लॅबचा वापर केला जाणार आहे.
तसेच, दहशतवादी व नक्षलवादी कारवायांसंबंधी माहिती शोधून संबंधित विभागाला पुढील कारवाई करण्यासाठी पाठविण्यात येईल.
तीन शिफ्टमध्ये २४ तास पोलीस कर्मचारी सोशल मीडियावर लक्ष
ठेवणार आहेत. त्यासाठी १८ कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. दोन महिन्यांपासून हे प्रशिक्षण सुरू होते. फेसबुक, यू ट्यूब, टिष्ट्वटर यांवर स्वतंत्र कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत.
३ शिफ्टमध्ये २४ तास ठेवणार लक्ष
या लॅबसाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये तीन शिफ्टमध्ये २४ तास पोलीस कर्मचारी सोशल मीडियावर लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी १८ कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वैयक्तिक आयुष्यात
ढवळाढवळ नाही
कायद्याच्या चौकटीत राहून लॅबचे कामकाज केले जाईल. या चौकटीत राहूनच कोणच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ केली जाणार नाही. पोलिसांकडे कोणाकडून तक्रार येण्यापूर्वीच अशा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शोधून कारवाई केली जाईल.
- के. के. पाठक, पोलीस आयुक्त
शहरामध्ये होणारे
मोर्चे, धरणे, आंदोलने यांबाबत आगाऊ माहिती घेण्यासाठीही या लॅबचा वापर केला जाणार आहे.
आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या लॅबद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.