पुणे शहरात ३० एप्रिलनंतर रस्ते खोदाल तर कारवाईला तयार राहा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:23 AM2024-04-03T10:23:24+5:302024-04-03T10:24:30+5:30
शहराशी जोडणाऱ्या महामार्गांसोबतच गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाइपलाइन, इंटरनेट केबल, ड्रेनेज, पावसाळी गटारे, एमएनजीएल तसेच वीज वाहिन्यांची कामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी
पुणे : शहराला जोडणाऱ्या महामार्गांसोबतच गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाइपलाइन, इंटरनेट केबल, ड्रेनेज, पावसाळी गटारे, एमएनजीएल तसेच वीज वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाईची कामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत. त्यानंतर १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत शहरात रस्ते खोदाई करता येणार नाही. जर या कालावधीत कोणी रस्ते खोदाई करताना आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.
शहरात पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. पाइपलाइन तसेच अन्य सर्व्हिस लाइन्सच्या कामामुळे वारंवार होणारी खोदाई आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरुस्तीमुळे शहरातून वाहन चालविणे अवघड होते. त्यामुळे शहराशी जोडणाऱ्या महामार्गांसोबतच गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाइपलाइन, इंटरनेट केबल, ड्रेनेज, पावसाळी गटारे, एमएनजीएल तसेच वीज वाहिन्यांची कामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती व रिसर्फेसिंगची १ मे ते १५ जूनपर्यंत कामे केली जाणार आहेत. रस्ते खोदाईची कामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतर १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत शहरात रस्ते खोदाई करता येणार नाही. जर या कालावधीत कोणी रस्ते खोदाई करताना आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे, असे पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.