उज्ज्वल भविष्यासाठी प्रदर्शनाला नक्की या! ‘लोकमत’च्यावतीने ऑटो क्लस्टर येथे शैक्षणिक प्रदर्शन
By विश्वास मोरे | Published: June 1, 2024 12:30 PM2024-06-01T12:30:06+5:302024-06-01T12:30:36+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी उद्घाटन झाले...
पिंपरी : सध्याच्या व नव्या शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन कशाप्रकारे करायचे, तसेच सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्सला जाताना नेमक्या कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची, यासारखे अनेक प्रश्न दहावी-बारावीच्या विद्यार्थी, पालकांना सतावत आहेत. त्यांच्या याच प्रश्नांचे निरसन करण्यासाठी ‘लोकमत’ने चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे शैक्षणिक प्रदर्शनाची सुरुवात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी उद्घाटन झाले.
शनिवार (दि. १) व रविवार (दि. २) असे दोन दिवस ‘लोकमत’च्यावतीने शैक्षणिक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड शहरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची माहिती तसेच करिअरविषयक तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच पदवी व पदविका विभागातही बदल करण्यात आले आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आले आहे. ज्ञानयज्ञाची सुरुवात शनिवार सकाळपासून झाली आहे.
करिअरविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शनिवार दि. १ जून २०२४
वक्ते - वेळ - विषय
१) डॉ. प्रफुल्ल हत्ते - दु. २ ते २:३० - करिअर निवडताना विद्यार्थी व पालकांची भूमिका
२) डॉ. मानसी अतितकर - दु. २:३० ते ३ - बदलते शैक्षणिक प्रवाह आणि रोजगाराच्या संधी
३) अजय पोपळघाट - दु. ४ ते ५ - ॲनिमेशन आणि व्हिजुअल इफेक्टसमधील संधी
४) डॉ. जितेंद्र भवाळकर - सायं. ५ ते ६ - वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक संधी
५) ब्रिगेडिअर हेमंत महाजन - सायं. ६ वा. - सैन्य दल व पोलिस दलातील संधी
रविवार दि. २ जून २०२४
वक्ते - वेळ - विषय
१) आशिष दुबे - स. ११ ते १२ - दहावीनंतर करिअरच्या संधी, प्लेसमेंटच्या अनुषंगाने अभियांत्रिकी महाविद्यालय व शाखेची निवड
२) प्रा. योगेश बोराटे - दु. २ ते ३ - करिअरसाठी सोशल मीडिया
३) विवेक वेलणकर - दु. ३ ते ४ - दहावीनंतर काय?
४) डॉ. शीतलकुमार रवंदळे - दु. ४ ते सायं. ५ - अभियांत्रिकी महाविद्यालय व शाखेची निवड
५) धीरज अग्रवाल - सायं. ५ ते ५:३० - बारावीनंतर करिअरच्या संधी
६) डॉ. ललितकुमार वाधवा - सायं. ५:३० ते ६ - इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअर
७) संतोष रासकर - सायं. ६ वा. - क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी