बियर्ड डे! क्लीन शेव्ह नको; सध्या ‘ट्रीम’चा जमानाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:47 AM2018-09-01T01:47:51+5:302018-09-01T01:48:57+5:30

वर्ल्ड बियर्ड डे आज : बॉलिवूड, क्रिकेटवीरांची क्रेझ कायम

Beard Day! No clean shave; Currently the time of 'trim' | बियर्ड डे! क्लीन शेव्ह नको; सध्या ‘ट्रीम’चा जमानाय...

बियर्ड डे! क्लीन शेव्ह नको; सध्या ‘ट्रीम’चा जमानाय...

Next

युगंधर ताजणे

पुणे : ओळखलंत का मला रस्त्यावर भेटला कुणी, दाढी होती त्याने वाढवलेली, केस होते पिंजारलेले..? एखाद्या दशकापूर्वी कॉलेजच्या आवारात, कँटीनमध्ये, विविध उद्यानांमध्ये भरगच्च दाढीवाले युवक सहजासहजी दिसायचे. त्या वेळी त्यांना ‘देवदास’, ‘आवारा’ या नावांची ओळख ठरलेली. काळाचा महिमा मोठा अगाध. बदलत्या जमान्यानुसार दाढीलादेखील साजूक, नाजूक, सोज्वळतेचे रूप आले. पूर्वी प्रेमभंग झालेला किंवा परीक्षेत नापास झालेला हेच दाढी ठेवायचे. ज्येष्ठांकडून त्या दिवसांच्या आठवणींचा पट अजूनही उलगडला जातो. आता मात्र काहीही झालं तरी ‘क्लीन शेव्ह’ नकोच, असा ट्रेंड वाढत असून, ट्रीमचा जमाना आला आहे.

बॉलिवूडच्या एकापेक्षा एक चित्रपटांची क्रेझ युवकांच्या मनावर असल्याने त्यात दाढीचा नव्याने समावेश झाला आहे. शहरातील हेअर पार्लरमध्ये तर दाढी वेगवेगळ्या आकारांत कोरण्यासाठी गर्दी पाहावयास मिळते. कुणाला बॉक्स टाइपची, तर कुणाला व्ही शेपची, कुणाला रेन्सो लुक यापेक्षा वेगळं म्हणजे ट्रंगल शेपमधील दाढीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याविषयी आठ ते दहा वर्षांपासून हेअर स्टायलिश म्हणून काम करणाऱ्या शुभम शिंदेला विचारले असता तो सांगतो, की तरुणांमध्ये विराट कोहली आणि बॉडी बिल्डर रोमन हेन्स यांच्या दाढीची प्रचंड क्रेझ आहे. सरासरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त युवक क्लीन शेव्हपेक्षा ती ट्रीम करण्यास प्राधान्य देतात. बहुतांश जण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखी दाढी ठेवतात. मात्र, त्या प्रकारच्या दाढीसाठी वेळ द्यावा लागतो. ज्याप्रमाणे केसांना वेगवेगळ्या प्रकारच्या केशकलपने रंगवले जाते, त्याच रीतीने हल्ली दाढीदेखील ‘ब्लू’, ‘ग्रीन’ अशा रंगांच्या शेडमध्ये रंगवली जाते.
पूर्वी दाढी राखणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे मानसिक आरोग्य स्थिर नाही, असा सरसकट अर्थ लावला जाई. आता दाढी करून गुळगुळीत झालेला चेहरा पाहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. खासकरून आयटी जॉब, मार्केटिंग फिल्ड, फिल्ममेकर्स, आर्टिस्ट आदी
प्रकारच्या व्यवसायांमध्ये दाढी हे सिम्बॉल बनले आहे.

विराटची दाढी ... सॉलिड भारी
आपल्या दाढीचा विमा उतरविल्याच्या बातमीमुळे विराट कोहली चर्चेत होता. मात्र, यामुळे यंग क्राऊडमध्ये दाढी क्रे झ भयंकर वाढली. आताही बॉलिवूडमधील अनेक मातब्बर कलाकारांपेक्षा विराटच्या दाढीची लोकप्रियता सर्वाधिक आहे.

चॉकलेट नव्हे; दाढीवाला हिरो...
काही वर्षांपासून प्रदर्शित झालेल्या मराठी, हिंदी चित्रपटांतील कलाकारांनी दाढी ठेवलेली दिसते. यावरून सध्या चॉकलेट नव्हे, तर दाढीवाल्या हिरोंची चलती अधिक आहे. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये दाढीची प्रचंड क्रेझ आहे. आपल्या चेहºयाला शोभेल अशा प्रकारची दाढी ठेवण्याकडे तरुणाईचा कल आहे.
- विकास चव्हाण, स्टायलिश

Web Title: Beard Day! No clean shave; Currently the time of 'trim'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे