मंदीची उच्चशिक्षितांना झळ; अकुशलांना आले ''अच्छे दिन''.....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:27 PM2019-09-28T16:27:58+5:302019-09-28T16:36:24+5:30
पिंपरी-चिंचवड, तळेगाव व चाकण या औद्योगिक परिसरात वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत..
नारायण बडगुजर-
पिंपरी : वाहन उद्योगात मंदी असल्याने पिंपरी-चिंचवडमधील अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मोठ्या कंपन्यांच्या पुरवठादार असलेल्या लघुउद्योजकांना कामगार कपात करावी लागत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित इंजिनिअरिंगमधील कर्मचारी तसेच उच्चशिक्षितांना मंदीची झळ बसली आहे. मात्र असे असले तरी ''हाऊस किपिंग'' मधील स्वच्छता, सफाई कामगारांना मंदीतही मागणी असल्याने ''अच्छे दिन '' कायम आहेत.
पिंपरी-चिंचवड, तळेगाव व चाकण या औद्योगिक परिसरात वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या पट्ट्याला '' ऑटो हब म्हणून ओळखले जाते. या कंपन्यांना वाहनांचे सुटे भाग पुरविणारे लघुउद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. यातील अनेक लघुउद्योगांमध्ये आॅटोमोबाइलशी संबंधित इंजिनिअरिंगवर आधारित कामकाज चालते. तसेच काही नामांकित कंपन्यांमध्येही अशा प्रकारचे काम केले जाते. त्यामुळे या इंजिनिअरिंग क्षेत्रातील हजारो उच्चशिक्षितांना या औद्योगिक पट्ट्यात रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र जागतिक मंदी असल्याने त्यातही त्याचा वाहनउद्योगावर मोठा परिणाम झाल्याने यातील अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली आहे.
सणासुदीच्या तोंडावर अनेकजण बेरोजगार झाले आहेत. यात हंगामी कर्मचारी व कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. कायमस्वरुपी नोकरी मिळत नसल्याने हंगामी तत्त्वावर काम केले जाते. असे असतानाही मंदी तसेच विविध कारणांमुळे या कर्मचारी व कामगारांना अचानक कामावरून कमी केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने अनिश्चिततेची टांगती तलवार असते.
हाऊस किपिंग मध्ये अकुशलांनाही संधी
प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेतलेल्या अकुशल बेरोजगारांना हाऊस किपिंगमध्ये सहज काम उपलब्ध होत आहे. हाऊस किपिंगमध्ये साफसफाईच्या कामाचा समावेश असतो. विविध शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, कंपन्या, खासगी आस्थापने आदी ठिकाणी साफसफाईसाठी कामगारांची आवश्यकता असते. मात्र असे काम करण्यास कोणीही सहज तयार होत नाही. त्यामुळे साक्षर होण्यापुरते शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाही ह्यहाऊस किपिंगह्णमध्ये संधी उपलब्ध होतात. अशा व्यक्ती ह्यहाऊस किपिंगह्णमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
तंत्रज्ञानात झपाट्याने बदल
तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांकडून रोबोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. असे असतानाही अनेकजण काही वर्षांपूर्वी प्राप्त केलेल्या कौशल्यावर आधारित काम करतात. मात्र, आपल्याकडील कौशल्य काळानुसार विकसित किंवा अद्ययावत करीत नाहीत. परंपरागत कौशल्याच्या आधारे कामाचा शोध घेतात. मात्र, काम मिळत नाही किंवा असलेले कामही सोडण्याची वेळ येते.
ठराविक कामांनाच प्रतिष्ठा
अमूक प्रकारचे काम प्रतिष्ठेचे आहे, त्यामुळे तेच काम करणार, इतर कोणतेही काम करणार नाही, अशी धारणा दिसून येते. मात्र प्रत्यक्षात कामाला प्रतिष्ठा संबंधितांच्या कर्तबगारीतून मिळत असते. त्यामुळे मिळेल ते काम करण्याची तयारी असणे आवश्यक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी बेरोजगारीला सामोरे जावे लागते.
सध्या तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. कायमस्वरुपी कामगार ही संकल्पना सध्या नाही. त्यामुळे हंगामी तत्त्वावरील कामगारांनी त्यांच्याकडील कौशल्य सतत अद्ययावत केले पाहिजे. सर्वच क्षेत्रातील कामगार व कर्मचाºयांसाठी ही बाब महत्त्वपूर्ण आहे. अन्यथा रोजगाराला मुकावे लागणार आहे.
- डॉ. दीपक शिकारपूर, तंत्रज्ञान सल्लागार
आॅटोमोबाइलमधील अभियांत्रिकीशी संबंधित कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. याचा पहिला फटका कंत्राटदाराकडील कर्मचाºयांना बसत आहे. मात्र असे असले तरी हाऊस किपिंगवाल्यांना मागणी कायम आहे. कर्मचारी कपात करणाºया कंपन्यांकडून साफसफाईसाठी सातत्याने सफाई कामगारांची मागणी करण्यात येते
- रमेश पवार, साईप्रसाद इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस