मयूरेश्वर अभयारण्यात ३३८ चिंकारा हरणे

By admin | Published: May 12, 2017 05:00 AM2017-05-12T05:00:12+5:302017-05-12T05:00:12+5:30

येथील श्री मयूरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या प्राण्यांच्या प्रगणनेत एकूण सात पाणवठ्यांवर चिंकाराची संख्या

To beat 338 chinkes in the Mayureshwar sanctuary | मयूरेश्वर अभयारण्यात ३३८ चिंकारा हरणे

मयूरेश्वर अभयारण्यात ३३८ चिंकारा हरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सुपे : येथील श्री मयूरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या प्राण्यांच्या प्रगणनेत एकूण सात पाणवठ्यांवर चिंकाराची संख्या अव्वल स्थानावर आढळून आली. इतर प्राण्यांपेक्षा चिंकारा जातीची ३३८ हरणे यावेळी आढळून आली.
येथील अभयारण्य हे चिंकारा जातीच्या हरणांसाठीच प्रसिद्ध आहे. तसेच १३ ससे, ३ तरस, ७ खोकडे, ५ मोर, १रानडुक्कर, २ घोरपड असे मिळून ३६९ प्राणी तसेच सूर्यपक्षी, गरुड, भारद्वाज, कोतवाल, बुलबुल, खाटीक, गरुड, होला, सातभाई, पकोडे आदी विविध प्रकारचे पक्षी आढळून आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश नागोसे यांनी दिली. या प्रगणनेत चिंकारा जातीचे १४१ नर, १६५ मादी व ३२ पाडस आढळून आले. मागील वर्षी झालेल्या प्रगणनेपेक्षा यावेळी चिंकारांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आल्याची माहिती वनपाल एस. डी. इंगोले यांनी दिली.
प्रगणनेसाठी नागोशे, वनपाल एस. डी. इंगोले, वनरक्षक डी. एम. ढेंबरे, अर्चना कवितके, पी. बी. कोंबडे आदींसह वाइल्ड फाउंडेशनचे १५ कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: To beat 338 chinkes in the Mayureshwar sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.