जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला व्यवस्थापकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:01+5:302021-04-05T04:10:01+5:30
पुणे : वारंवार देत असलेल्या त्रासाबद्दल व अपमानास्पद वागणुकीबद्दल विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिला व्यवस्थापकाला लाकडी पट्टीने व पोटात लाथा ...
पुणे : वारंवार देत असलेल्या त्रासाबद्दल व अपमानास्पद वागणुकीबद्दल विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिला व्यवस्थापकाला लाकडी पट्टीने व पोटात लाथा मारून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी खडक पोलिसांनी मालकाला अटक केली आहे.
अशोक सोहन राज नहार (वय ५२, रा. अजमेरा सोसायटी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वीणा नहार हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धायरी फाटा येथे राहणा-या ५० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या अशोक नहार याच्याकडे व्यवस्थापक पदावर नोकरीस होत्या. नहार हा वारंवार महिलेला सर्वासमोर अपमानास्पद वागणूक देत होता. तसेच धनादेशाद्वारे महिलेला दिलेले पैसेही त्याने थांबविले होते. याचाच जाब विचारण्यासाठी त्या २९ मार्च रोजी गेल्या असताना आरोपींनी त्यांना फर्निचरच्या जाड लाकडी पट्टीने डोक्यात व डाव्या हातावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच दोघांनी त्यांच्या पोटात लाथा मारून शिवीगाळ करून कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाय. पी. सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.