इच्छाशक्तीच्या जोरावर मारणे कुटुंबाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:23+5:302021-05-12T04:10:23+5:30

धनकवडी येथील किरण मारणे हे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आहेत. मागील संपूर्ण वर्षभर योग्य ती काळजी घेऊन ते दररोज ...

Beat the will to overcome the family's corona | इच्छाशक्तीच्या जोरावर मारणे कुटुंबाची कोरोनावर मात

इच्छाशक्तीच्या जोरावर मारणे कुटुंबाची कोरोनावर मात

Next

धनकवडी येथील किरण मारणे हे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आहेत. मागील संपूर्ण वर्षभर योग्य ती काळजी घेऊन ते दररोज पाणीपुरवठा करण्याचे कर्तव्य बाजावत होते. परंतु अखेर मारणे यांना कोरोनाने गाठले. मात्र, इतर काही त्रास नसल्याने वैद्यकीय सल्ल्याने होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

दरम्यान, दोन दिवसांनंतर मारणे यांची आई सुनीता शिवाजी मारणे (वय ६२ वर्षे) यांना त्रास जाणवू लागला. त्यांही पॉझिटिव्ह आल्या. यावेळी मात्र संपूर्ण मारणे कुटुंब चिंताग्रस्त झाले. मात्र खोकल्याचा त्रास वाढल्याने किरण मारणे यांनी डॉक्टर किरण खालाटे रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. दोघांनाही दाखल करण्यात आले.

त्यानंतर लगेच घरातील इतर सर्वांचे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये लहान भाऊ रुपेश मारणे, वय ३५ वर्षे, मुलगी सानवी रुपेश मारणे, चारवी किरण मारणे वय दोन वर्षे यांची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली. मात्र, सौम्य लक्षणे असल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. डाॅक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार सकस व पौष्टिक आहार आणि सकारात्मक विचारसरणीसह प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मारणे कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाचही सदस्यांनी अखेर कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.

कोट

शरीरातील विषाणूला घालवण्याचे काम औषधं करतातचं, पण मनातील भीती, वाईट विचार घालवण्यासाठी सकारात्मक विचार करणारे, धीर देणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे डॉक्टर, मित्रमंडळी प्रत्येकाजवळ असणे खूप गरजेचे आहे." - किरण शिवाजी मारणे, धनकवडी.

Web Title: Beat the will to overcome the family's corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.