वैद्यकीय बिल मागितल्याप्रकरणी महिलेकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:34+5:302021-01-16T04:15:34+5:30

पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण -- ओतूर : स्वमालिकीची जमीन विकण्यासाठी आलेल्या ग्राहकाला जमीन दाखवत असताना शेजारच्या शेतजमीन मालकांनी पूर्ववैमनस्यातून जागा ...

Beaten by a woman for asking for a medical bill | वैद्यकीय बिल मागितल्याप्रकरणी महिलेकडून मारहाण

वैद्यकीय बिल मागितल्याप्रकरणी महिलेकडून मारहाण

Next

पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण

--

ओतूर : स्वमालिकीची जमीन विकण्यासाठी आलेल्या ग्राहकाला जमीन दाखवत असताना शेजारच्या शेतजमीन मालकांनी पूर्ववैमनस्यातून जागा विकण्यासाठी काढलेल्या व्यक्तीस मारहाण केली. ही घटना खामुंडी (ता. जुन्नर) गावातली बोडकेनगर येथे गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुभाष विष्णू बोडके, अजित सुभाष बोडके, अभिजित सुभाष बोडके, आशिष अशोक बोडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भास्कर सखाराम बोडेक हे त्यांची शेतजमिनी विकण्यासाठी ती शफीशेठ मोमी यांना दाखवत होते. त्यावेळी सुभाष बोडके हे शेतात काम करत होते. त्यांनी भास्कर बोडके यांना पाहत ‘तू शेतात का आला’ असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामध्ये भास्कर बोडके जखमी झाले व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून गहाळ झाली. याबाबत ओतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

Web Title: Beaten by a woman for asking for a medical bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.