Mahavitaran: दौंडमध्ये विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 04:36 PM2022-01-17T16:36:05+5:302022-01-17T16:36:17+5:30
शेतीपंपाच्या थकीत वीज बिलापोटी विद्युत जोड तोडण्यासाठी गेलेल्या विद्युत महावितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मारहाण केली
दौंड : कानगाव (ता. दौंड ) येथे शेतीपंपाच्या थकीत वीज बिलापोटी विद्युत जोड तोडण्यासाठी गेलेल्या विद्युत महावितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मारहाण केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यात विद्युत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. शेतीपंपाचे तोडलेले कनेक्शन हे बसून द्यावे म्हणून ग्रामस्थांनी विद्युत कर्मचाऱ्यांना धरून ठेवले होते. दरम्यान पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची सुटका केली असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्पष्ट केले.
संदर्भात गावच्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर २२ हजार होल्टची मुख्य विद्युततार तोडून शेतामध्ये टाकून पळून गेले होते. तुटलेल्या वायरीला शेतकऱ्यांच्या धक्का लागला असता तर विपरीत घडले असते. वीजजोड तोडू नका असे शेतकरी विद्युत कर्मचाऱ्यांना सांगत होते. मात्र कर्मचाऱ्यांनी ऐकणार ऐकले नाही परिणामी संतप्त शेतकरी आणि कर्मचाऱ्याला बाचाबाची झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या छातीत दुखू लागल्याने या पोलिस अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले.