रस्त्यावील खड्डे बुजवणाऱ्या अभियंत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:28+5:302021-07-16T04:09:28+5:30

लोणी काळभोर : पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूमाच्या साह्याने बुजवत असताना त्याचा रा. आल्याने जवळपास ८ जनांनी साईट इंजिनियरच्या ...

Beating the engineer who was filling the potholes in the road | रस्त्यावील खड्डे बुजवणाऱ्या अभियंत्याला मारहाण

रस्त्यावील खड्डे बुजवणाऱ्या अभियंत्याला मारहाण

Next

लोणी काळभोर : पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूमाच्या साह्याने बुजवत असताना त्याचा रा. आल्याने जवळपास ८ जनांनी साईट इंजिनियरच्या गळ्याला तलवारी लावुन हातातील लाठ्या व लाथांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना तरडे (ता.हवेली) येथे घडली.

अनिल पांडुरंग जगताप (वय ३९, रा. जगताप मळा, गणपती मंदिरामागे, तरडे गांव, ता हवेली) असे मारहाण झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून रविंद्र किसन जगताप (वय ६५), वसंत सोपानराव जगताप (वय ५५), शरद जयवंत जगताप (वय ३६), किशोर वसंत जगताप (वय २३), केतन वसंत जगताप (वय २०), किरण किसन जगताप (वय ३६), किसन सोपानराव जगताप (वय ६५), जयवंत सोपानराव जगताप (६२ वय सर्व रा. जगताप मळा, तरडे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल जगताप हे दामले-गंधे असोसिएटस यांच्याकडे साईट इंजिनिअर या पदावर कार्यरत आहेत. बुधवारी (दि १४) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ते तरडे रस्ता, कुरकुंडे वस्ती या ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे झालेल्या खड्डे ट्रकमधून थोडा थोडा थोडा मुरुम खाली उतरवुन खड्डे बुजवत होते. दुपारी १.१५ च्या सुमारास जगताप मळा, तरडे मध्ये राहणारे त्यांचे परिचयाचे व भावकीचे वरील ८ जण व दोघे दोन मोटारीतून आले. त्यांच्या हातात काठ्या घेऊन खाली उतरले. त्यांच्यापैकी वसंत आणि रविंद्र जगताप यांनी त्यांच्या हातातील तलवारी अनिल जगताप यांच्या गळ्याला लावुन मुरुमाच्या गाड्या अडवल्या. रस्त्यावरील खड्डे का बुजवितो. हालायचे नाही असा दम दिला. त्यानंतर सर्वांनी त्यांच्याजवळील काठ्या आणि लाथा बुक्यांनी जगताप यांना मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळी असणारे अजय गाढवे, नितीन जगताप या दोघांनी त्यांना उपचारासाठी विश्वराज रूग्णालयात दाखल केले. ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या खिशातील ४५ हजार रुपये रोख व गळ्यातील ६.५ तोळे वजनाची सोन्याची चैन नसल्याचे त्यांचे लक्षात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे करत आहेत.

Web Title: Beating the engineer who was filling the potholes in the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.