हॉटेल व्यावसायिकाला मारहाण; गल्ल्यातील रक्कम लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:15+5:302021-04-01T04:10:15+5:30
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दीपक चंद्रकांत राऊत या हॉटेलचालकाने फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.२८) रोजी ही घटना घडली. ...
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दीपक चंद्रकांत राऊत या हॉटेलचालकाने फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.२८) रोजी ही घटना घडली. धनंजय पाथरकर याने रविवारी सकाळी १० च्या सुमारास दीपक यांना फोन केला. तू माझा भाऊ सचिन याच्यावर गुन्हा का दाखल केला, तू केस माघारी घे अशी धमकी त्याने फिर्यादीला दिली. त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास धनंजय पाथरकर हा दुचाकीवरून हॉटेल मध्ये गेला. माझ्या भावाविरोधात केलेल्या तक्रारीच्या रागातून त्याने फिर्यादीला दोन, तीन कानफाटीत मारल्या व हातात गज घेऊन त्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीला ढकलून देत आरोपीने काऊंटरच्या आत प्रवेश करत गल्ल्यातील ५५०० रुपये व पॅनकार्ड काढून घेतले.
फिर्यादीची कॉलर पकडून हॉटेलबाहेर ओढून आणत हॉटेल बंद करण्यास भाग पाडले. यापुढे मी जेव्हा हॉटेलात येईल त्यावेळी मला तू खर्चासाठी पैसे द्यायचे असा दम दिला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत पुन्हा कामाला आला तर तुम्हाला एकेकाला गाठून मारतो, अशी दमबाजी केली. दरम्यान दुचाकीवरून धनंजय पाथरकर हा तेथून जात असताना एका चारचाकी वाहनाला तो धडकला. पडलेली दुचाकी उचलत तो तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
---------------------------