मानसिक रुग्ण तरुणीला घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण; गैरसमजातून घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:34 PM2022-07-27T15:34:30+5:302022-07-27T15:34:37+5:30

तरुणीवर मानसिक उपचार सुरू असून पाषाण भागातील एका रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये घेऊन चालले होते

beating of medical personnel who were taking mentally ill young woman It was a misunderstanding | मानसिक रुग्ण तरुणीला घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण; गैरसमजातून घडला प्रकार

मानसिक रुग्ण तरुणीला घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण; गैरसमजातून घडला प्रकार

googlenewsNext

सचिन सिंग

वारजे : महिलांवर होणारे वाढते अत्याचार पाहता समाज काहीसा जागरूक झाला आहे, पण या अतिसंवेदनशीलतेपायी काही वेळा अनावधानाने चांगले कार्य करणाऱ्यांनाही त्याचा फटका बसतो. असाच काहीसा प्रकार कर्वेनगरमध्ये मंगळवारी दुपारी घडला. मानसिक उपचारांसाठी तरुणीला घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यालाच जमावाने अनावधानाने मारहाण केली. त्यानंतर डाॅक्टरांनी खुलासा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कर्वेनगर येथील विकास चौकाजवळ एका वीशीतल्या तरुणीला काहीजण जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्या तरुणीचे जोरजोरात ओरडणे व विरोध पाहून काही नागरिकांनी त्यांना हटकले, पण तिला नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या तिघा चौघांनी नागरिकांना जुमानले नाही. तरुणीचा वाढता विरोध पाहता शेजारीच असलेल्या एका माजी मानानियांच्या कार्यालयातील तरुण, कार्यकर्तेही या गोंधळात सहभागी झाले व तरुणीला नेणाऱ्यांशी वाद घालू लागले. यात दोन्ही बाजूने विरोध वाढल्याने एकाला या जमावाने धक्काबुक्की करत ''प्रसाद'' दिला.

प्रकरण शांत झाल्यावर त्या कर्मचाऱ्यांनी खुलासा केला की, कथित तरुणीवर मानसिक उपचार सुरू असून पाषाण भागातील एका रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तिला नेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आमची रुग्णवाहिका पुढे काही अंतरावर उभी आहे. ती आमच्यासोबत येत नसल्यामुळे तिला आम्ही इंजेक्शन दिले व म्हणून तिला जबरदस्तीने नेत आहोत.

या प्रकारानंतरही ही तरुणी यांच्यासोबत मला जायचे नाही. तेथे गेल्यावर मला त्रास होतो, असे म्हणत होती. हा खुलासा ऐकल्यावर माननियांनी जवळच्या कर्वेनगर पोलीस चौकीला फोन करून त्यांचे कर्मचारी बोलावून घेतले. दरम्यान, संबंधित मुलीचे पालक देखील तेथे आले व त्यांनीही मुलीवर उपचार सुरू असल्याचे मान्य केले व आपल्या सहमतीनेच महिलाडॉक्टर व कर्मचारी तिला घेऊन जात आहेत अशी माहिती दिली, पण या सर्व गोंधळात रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला मात्र नाहक नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले.

पालक सोबत नसल्याने गोंधळ

एक मुलगी जिच्या पायात चप्पल नाही. तिला तीन-चारजण अक्षरश: ओढत घेऊन जातात मग पाहणाऱ्याला अपहरणासारखीच घटना घडती आहे की काय असे वाटणे स्वाभाविकच आहे. या गोंधळात सर्वांनी शांतपणे एकमेकांची बाजू ऐकून घेणे गरजेचे असताना त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे ही घटना घडली. वास्तविक मुलीला नेताना तिचे नातेवाईक सोबत असणे गरजेचे होते, तसे न झाल्याने गैरसमजातून हा प्रकार घडला.

Web Title: beating of medical personnel who were taking mentally ill young woman It was a misunderstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.