माहिती पडताळण्यासाठी आलेल्या पोलिसांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:21+5:302021-07-14T04:12:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांना माहिती देतो या कारणावरून खब-याला, तसेच मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी आलेल्या दोघा पोलिसांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांना माहिती देतो या कारणावरून खब-याला, तसेच मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी आलेल्या दोघा पोलिसांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
महेश ऊर्फ रोहित ऊर्फ दाद्या मोरे (वय २०, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २७ जणांसह त्यांच्या इतर १२५ ते १५० साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत श्रीकांत दगडे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. २२ जून २०२१ रोजी वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनी परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी आणि त्यांचा सहकारी यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. ही माहिती पडताळण्यासाठी फिर्यादी, त्यांचा सहकारी हे बातमीदारासह वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनी परिसरात गेले होते. त्यावेळी मोरे याच्यासह इतर १२५ ते १५० साथीदारांनी त्यांच्याबाबत पोलिसांना माहिती देतो असे म्हणत खब-याला दगड, बांबू, स्टंप, सिमेंटचे ब्लॉक मारून त्याला गंभीर जखमी केले. तसेच लोकांनी फिर्यादी आणि त्यांच्या सहका-याला मारहाण करून त्यांनादेखील गंभीर जखमी करत सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी मोरे याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंग जाधव यांनी केली.
---------------------------------------------------------------------------