कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्यांना 'बेक्कार' चोपला; धडाकेबाज पोलिसांचा पुण्यात सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 01:46 PM2022-12-30T13:46:24+5:302022-12-30T13:57:55+5:30

पोलीस दलातील या जवानांचे कौतुक करण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला अनेक लोक पोहचले...

beating those spreading terror with Koita; Brave police felicitated in Pune | कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्यांना 'बेक्कार' चोपला; धडाकेबाज पोलिसांचा पुण्यात सत्कार

कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्यांना 'बेक्कार' चोपला; धडाकेबाज पोलिसांचा पुण्यात सत्कार

googlenewsNext

पुणे : सोशल मीडियावर भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीवर काल रात्री दोन गुंड हातात कोयता घेऊन स्थानिक नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून आपली दहशत निर्माण होईल असे वागत होते. या बद्दलची माहिती नागरिकांनी पोलीस कन्ट्रोल रूमला फोन कळवली होती. त्यानंतर घटनेची गंभीरता ओळखून जवळील मार्शलच्या पोलीसांनी अतिशय तत्परतेने येऊन त्या गुंडांना चोप देत ताब्यात घेतले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बातमी अनेक नागरिकांना समजली. त्यामुळे पोलीस दलातील या जवानांचे कौतुक करण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला अनेक लोक पोहचले होते. त्यापैकी कात्रजच्या माजी नगरसेविका मनीषा कदम यांनी सिंहगड रोड पोलिस मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

वडगाव बुद्रुक आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजच्या जवळील दुकानात दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता. त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार घडला आहे. 

मात्र सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गस्तीवर असेलल्या मार्शलला याबाबत काही कॉलेजच्या तरुणांनी हा प्रकार सांगितल्याने त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतले. दारू पिलेल्या अवस्थेत असलेल्या या तरुणाने हातात कोयता घेऊन दहशत माजवित हे कृत्य त्याने केले. इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अक्षय इंगवले व धनंजय पाटील  या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्या आरोपीला ताब्यात घेतले.



Web Title: beating those spreading terror with Koita; Brave police felicitated in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.