खंडणीची मागणी करत ट्रक चालकांना मारहाण; भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या अध्यक्षाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:22 PM2023-07-06T12:22:01+5:302023-07-06T12:22:35+5:30

याप्रकरणी भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे...

Beating truck drivers demanding extortion; President of Bharatiya Janata Mathadi Transport Association arrested | खंडणीची मागणी करत ट्रक चालकांना मारहाण; भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या अध्यक्षाला अटक

खंडणीची मागणी करत ट्रक चालकांना मारहाण; भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या अध्यक्षाला अटक

googlenewsNext

पिंपरी : माझ्या एरियामधून माल न्यायचा असेल तर प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत ट्रक चालकांना मारहाण करत जबरी चोरी केली. याप्रकरणी भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ४) रात्री सव्वा अकरा वाजता ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जात असताना आरोपी त्याच्या सफारी कार (एमएच १२ जेसी ७३९२) मधून आला. त्याने त्याची कार फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या दोन ट्रकला आडवी लावली. आरोपीने तिन्ही ट्रक चालकांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केला.

मी सुरेश बनसोडे आहे. भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्ही माझ्या एरियामधून मला पैसे न देता माल कसा घेऊन जाणार, असे म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली.

Web Title: Beating truck drivers demanding extortion; President of Bharatiya Janata Mathadi Transport Association arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.