कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By विवेक भुसे | Published: May 15, 2023 11:39 AM2023-05-15T11:39:29+5:302023-05-15T11:40:20+5:30

पतीने मारहाण केल्यावर घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या चौकशीत खरा प्रकार उघड झाला

Beating wife who has fit problem for not giving box while going to work; Unfortunate death of a woman | कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

पुणे : कामाला जाण्यासाठी डबा बनवून न दिल्याने झालेल्या वादावादीत पत्नीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यु झाला. कोंढवा पोलिांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. शितल सोमनाथ पांडागळे (वय २७) असे मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव आहे. सोमनाथ महादेव पांडागळे (वय ३०, रा. उंड्री, होले वस्ती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. 

याबाबत पोलीस हवालदार संजय देसाई यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उंड्रीतील होले वस्तीत शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल पांडागळे हिला फिटचा त्रास आहे. तिला नातेवाईकांनी ससून रुग्णालयात आणले होते. तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. पोलिसांना पंचनामा करीत असताना तिच्या अंगावर जखमा दिसल्या. तसेच डॉक्टरांनी महिलेचा मृत्यु मारहाणीमुळे झाल्याचा अहवाल दिला. त्यावरुन तिचा पती सोमनाथ याच्याकडे चौकशी केल्यावर खरा प्रकार समोर आला. सोमनाथ याला सकाळी कामाला जायचे होते. तरीही शितल हिने डबा बनवून दिला नाही. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा सोमनाथ याने हाताने व लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, पायावर अंगावर मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यु झाला. तिला फीटचा त्रास होत असल्याचे सांगून सोमनाथ याने हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या चौकशीत खरा प्रकार उघड झाला. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Beating wife who has fit problem for not giving box while going to work; Unfortunate death of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.