तुम्ही रोज एवढ्या रात्री कोणाशी चँटिंग करता विचारल्याने पत्नीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:44+5:302021-04-12T04:10:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘तुम्ही रोज एवढ्या रात्री कोणाशी चॅटिंग करता, आमच्यासोबत का बोलत नाही, अशी विचारणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘तुम्ही रोज एवढ्या रात्री कोणाशी चॅटिंग करता, आमच्यासोबत का बोलत नाही, अशी विचारणा करणा-या पत्नीला चिडून जाऊन शिवीगाळ आणि लाकडी बांबूने जखमी करीत, मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल चांदेकर (वय ३५, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना एक लहान मुलगा आहे. पती घरी असूनही आमच्यासोबत बोलत नाही, रोज कुणाशी चॅटिंग करत असता अशी फक्त पत्नीने विचारणा केली. त्याचा पतीला राग आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करून कंबरेच्या पट्ट्याने, वायरने आणि लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांचा मुलगा भांडण सोडविण्यास आला असता त्याला देखील शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली. या कारणास्तव पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.