मोरगावच्या मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:06 PM2022-05-03T20:06:00+5:302022-05-03T20:07:53+5:30

यावेळी गणेश भक्त व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती

beautiful decoration of mango fruits at mayureshwar morgaon | मोरगावच्या मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट

मोरगावच्या मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट

Next

मोरगाव (पुणे) : अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव (ता . बारामती) येथील मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट करण्यात आली होती. श्रींच्या मुर्तीस आंब्यांच्या सजावटीसाठी गावातील व्यापारी, गुरव-पुजारी, गणेश भक्तांनी, तरुण मंडळ यांनी ५० डझन आंबे  दिले होते. दुपारी ३ वाजता पुजेनंतर आंब्याची सुंदर आरास  करण्यात आली होती. हे पाहण्यासाठी गणेश भक्त व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.

आज अक्षयतृतीया निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मयुरेश्वर मंदिराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांसाठी खुला करण्यात आला. या दिवशीचा मुहूर्त साडेतीन मुहर्तापैकी एक समजला जातो यामुळे राज्यभरातील भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अक्षयतृतीया निमित्ताने श्रींस आंब्यांची आरस करण्याचे ठरल्यानंतर पेठेतील व्यापारी, तरुण मंडळ, गणेश भक्त व गुरव पुजारी यांनी पन्नास डझन आंबे जमा केले होते. 

दुपारी तीन वाजता श्रींची पुजा करण्यात आली. यानंतर गौरव  गाडे, अर्थव धारक, प्रथमेश गाडे, नंदू धारक, श्रेयश धारक, अंकुश गुरव आठवडेकरी पुजारी महेश गाडे यांनी श्रींची पुजा करुन मयुरेश्वर व सिद्धी बुद्धी मातेस पोशाख चढविला. यानंतर सुमारे सहाशे आंब्यांची सुंदर आरास  करण्यात आली. यामुळे मुर्ती गाभाऱ्यास वेगळी शोभा जाणवत होती. ही सजावट सुमारे दोन तास चालली होती. आंब्यांची आरास केलेला श्रींचा हा फोटो सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल झाला. 

Web Title: beautiful decoration of mango fruits at mayureshwar morgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.