किक्रेटमध्ये खूप पळवतात म्हणून अभिनेता झालो! अभिनेते सौरभ शुक्लांनी उलगडली आयुष्याची कथा
By श्रीकिशन काळे | Published: November 25, 2023 01:46 PM2023-11-25T13:46:09+5:302023-11-25T13:50:37+5:30
डेक्कन लिटरेचर फेस्टिवलचे उद्घाटन शनिवारी सकाळी शुक्ला यांच्या हस्ते झाले....
पुणे : लहानपणी मी खूप काही करायचो. काहीही केले तरी घरचे काही बोलायचे नाही. हे काय फालतू काम करतोय, असे मला कधीच ऐकायला मिळाले नाही. आपल्या भारतीय लोकांचे दोन स्वप्ने असतात. अभिनेता आणि क्रिकेटर बनने. पण मी क्रिकेटर नाही बनलो . तिथे खूप पळवतात, म्हणून मी तिकडे न जाता अभिनेता बनलो, असे जेष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला यांनी आपल्या आयुष्याची कथा उलगडली.
डेक्कन लिटरेचर फेस्टिवलचे उद्घाटन शनिवारी सकाळी शुक्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी जेष्ठ नाट्यकर्मी वामन केंद्रे, पं. रामदयाल शर्मा, वसंत आबाजी डहाके, सुरेशकुमार वैराळकर, मोना सिंग, सलीम आरिफ, युवराज शहा आदी उपस्थित होते. यानंतर सलिम अरीफ यांनी शुक्ला यांची मुलाखत घेतली.
सौरभ शुक्ला म्हणाले, माझ्या घरी प्रत्येक आठवड्याला एक हिंदी एक इंग्रजी पहायचो. त्यातून चित्रपट, नाटकाची गोड लागली. फिल्म पाहणे मला आवडायचे. दुसर्या दुनियेत फिल्म घेऊन जातात. म्हणून फिल्मचा शौक बनला. वय वाढलं आणि मग गर्लफ्रेंडची गरज लागते पण त्यात मी कमजोर होतो. एक गोष्ट कमी दिली तर कुठं तरी जास्त मिळालेले असते. मी चित्रपटाची वाट पकडली. मी सहावीत असताना पिक्चर बनविण्याचे मित्रांसोबत ठरवले. माझ्या भावाकडे कॅमेरा होता. पैसे वर्षभर वाचवून खूप फोटो काढून त्याचा पिक्चर बनवू. आम्ही खूप वेडे होतो. तेव्हा पिक्चर कसा तयार होतो ते माहित नव्हते. ते नंतर समजले पिक्चर कसा तयार होतो.
...अन् मी लिहू लागलो !
लिहायला मी शिकलो. खरंतर मला लिहिण्यात मला इंटरेस्ट नव्हता. पण लिहू लागले आणि आज रोज लिहितो. लिहिणं ही माझी गरज बनली. जेव्हा पहिले नाटक लिहिले. तेव्हा अगोदर मला नाटक समजत नव्हतो. ते वाचताना कळत नाही. नाटकाला कसे समजून घेऊ असं तेव्हा वाटत होतं. मग मी स्वतःच लिहू लागलो. मी लिहिलं तर मला ते समजेल. त्यानंतर लिहिलं आणि लिहितच गेलो.
शेखर कपूर यांनी रोल दिला....
मी जेव्हा नाटक करत होतो. तेव्हा एक दिवस शेखर कपूर यांनी आमचे नाटक पाहिले. तेव्हा त्यांनी मला बॅक स्टेज बोलावले आणि माझ्याकडे पाहून निघून गेले. मला काहीच बोलले नाही. नंतर अचानक मला सांगितले की मी त्यांच्या 'बॅंडिट क्लीन' मध्ये रोल दिलाय. त्यांना माझ्यासारखा अभिनेता त्यांच्या चित्रपटात हवा होता, असे शुक्ला यांनी सांगितले.
...म्हणून जजचे कॅरेक्टर गाजले !
जाॅली एल एल बी चित्रपटातील न्यायाधिश हे कॅरेक्टर खूप प्रसिद्ध झाले. त्याविषयी शुक्ला म्हणाले, मी जेव्हा या लोअर क्लास जजचे कॅरेक्टर करणार होतो तेव्हा विचार केला की, हा जज लोअर क्लासचा आहे. कमी पगार असेल, त्याचा बंगला नसेल, तो जाड आहे मग त्याला अॅसिडटी होत असेल, तो गाडीतून न्यायलयात येताना वाहतूक कोंडीत अडकत असेल. तर हे सर्व त्या कॅरेक्टरमध्ये यायला हवं होतं. ते मी समजून केलं आणि हे कॅरेक्टर खूप गाजलं.