तरुणांच्या जागरूकतेमुळे ‘तो’ परतला कुटुंबात
By admin | Published: July 2, 2017 02:12 AM2017-07-02T02:12:50+5:302017-07-02T02:12:50+5:30
सांगवी, तालुका बारामती येथील एसटी बसस्थानकावर सापडलेला सातारा येथील अल्पमतीमंद मुलगा तरुणांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : सांगवी, तालुका बारामती येथील एसटी बसस्थानकावर सापडलेला सातारा येथील अल्पमतीमंद मुलगा तरुणांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या मदतीमुळे त्याच्या घरी सुखरूप पोहोचला.
सागर संजय जाधव (वय १६, रा. भुर्इंज, ता. वाई, जि. सातारा) हा अल्पमतिमंद मुलगा त्याच्या घरी ३-४ दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे निधन झाले होते. यावेळी घरचे सर्व त्यातच व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत तो अचानकपणे घरी कोणालाही काही न सांगता नजर चुकवून घरातून निघून गेला. एक सॅक त्यामध्ये बूट ,कपडे ,आणि एक मोबाईल घेऊन तो एसटीने प्रवास करीत सांगवीच्या बसस्थानकावर उतरला असता, तो तेथील काही तरुणांना भेटला असता त्यांच्याशी त्याच्या संवाद साधू लागला, त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते, त्याच्याकडील बॅग पाहून त्यावेळी त्या तरुणांना तो एखाद्या आश्रमशाळेतून पळून आला असेल, असा संशय वाटू लागला, तरुणांनी त्याची विचारपूस केली, त्याला लिहिता वाचता येत नव्हते, त्याच्या कडे काही तिकीटे आढळून आली. मी माझ्या मामाच्या घरी निघालो आहे, इथे कारखाना कुठे आहे, असे तो त्याच्या बोबड्या भाषेत विचारपूस करू लागला.
बोलता बोलता तो खोटे बोलू लागला. तर त्याचा मामा व नातेवाईक तिथे कोणीच नव्हते, यामुळे त्याचा संशय आला की तो पळून आला आहे, तो आणखी कुठे जाऊन काही अनर्थ होऊ नये या हेतूने वैभव बाळासाहेब जगताप, ऋषीकेश जालिंदर शिंदे, कपिल बापूसोा जगताप व
काही तरुणांनी त्याला माळेगाव पोलीस स्टेशनला सूपूर्त केले, माळेगाव दुरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल शरद वारे यांनी अथक प्रयत्नांनंतर त्याच्या आईचा शोध लावला. त्याच्या आईला फोन करून माहिती कळवली असता, त्याची आई माळेगाव पोलीस स्टेशनला काही तासांत पोहचली व वारे यांनी सागर याला त्याच्या आईच्या हवाली केले. घरात कोणालाही काहीही न सांगता निघून आलेल्या अल्पमतिमंद मुलाला सांगवीतील तरुणांच्या व पोलिसांच्या मदतीने त्याला
त्याच्या आईची भेट
करून दिली.