दसऱ्यामुळे झेंडू खातोय भाव
By Admin | Published: October 22, 2015 02:58 AM2015-10-22T02:58:16+5:302015-10-22T02:58:16+5:30
दसऱ्यानिमित्त गुलटेकडी फूल बाजारात पुण्यासह जुन्नर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि बीड भागातून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांना घाऊक
पुणे : दसऱ्यानिमित्त गुलटेकडी फूल बाजारात पुण्यासह जुन्नर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि बीड भागातून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांना घाऊक बाजारात बुधवारी झेंडूच्या प्रतिकिलोस ३0 ते १00 रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात फुलांच्या दजार्नुसार ८० ते १४० रुपये किलो, असा भाव मिळाला.
गुुलटेकडी फूलबाजारात बुधवारी सर्वच फुलांची आवक वाढली असून, दर तेजीत आहेत. रविवारच्या तुलनेत आज जुईमध्ये २00 ते ३00 रुपये, गुलछडीच्या दरात १२0, तर कार्नेशियनमध्ये ५0, तर डच गुलाबमध्ये ४0 रुपयांनी किलोमागे वाढ झाली आहे.
दसऱ्याला स्थानिक ग्राहकांबरोबरच कोकणातूनही झेंडूला मागणी वाढली आहे. बाहेरील व्यापारी गुलटेकडी मार्केटयार्डात झेंडू खरेदीसाठी येत आहेत. गुरुवारी या दरामध्ये फारसा फरक पडणार नसल्याची माहिती व्यापारी हरिभाऊ कामठे आणि सागर भोसले आणि यांनी दिली. शुक्रवारी फूल; तसेच केळी मार्केट बंद राहणार आहे.
बाजारात यावर्षी पुणे जिल्ह्यातून गराडे, यवत, चांबळी, शिवरी, इंदापूर, बारामती, दौंडसह बार्शी येथून आवक झाली आहे. स्थानिक आवक कमी असून, पुण्याबाहेरून अधिक आवक आहे.
पिवळा गोंडा : ७0 ते १00
लाल गोंडा : ७0 ते १00
कलकत्ता गोंडा : ७0 ते ११0
तुळजापुरी गोंडा : ५0 ते ९0
साधा गोंडा : ४0 ते ५0
अॅरागोल्ड प्रकारचा झेंडू : ८0 ते ९0
किलोला मिळालेला दर रुपयांमध्ये