घरच्यांचा, सहकाऱ्यांचा पाठिंबा आणि योग्य नियोजनामुळे यश - तेजस्विनी सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:50 AM2018-04-16T01:50:43+5:302018-04-16T01:50:43+5:30
घरच्यांचा व सहकाºयांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे महाराष्ट्राच्या ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनी सावंतने सांगितले.
पुणे - घरच्यांचा व सहकाºयांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्टÑकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे महाराष्ट्राच्या ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनी सावंतने सांगितले.
भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्टÑीय विमानतळावर सुवर्ण व रौप्य पदकविजेत्या तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. या घोषणा सुरू असतानाच तिचे आगमन झाल्यावर तिने वरील वक्तव्य केले. तेजस्विनी म्हणाली की, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असल्यामुळे मी ही दोन पदके जिंकण्याची कामगिरी करू शकले. सुरुवातीला मनात जरा हुरहूर होती; कारण बºयाच वर्षांनी मी मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत सहभागी होत होते. पण एकदा स्पर्धा सुरू झाली आणि मनावरचे दडपण नाहीसे झाले. कारण जिद्द होती पदक जिंकण्याची. या स्पर्धेच्या तयारीदरम्यान माझे पती व सासू यांच्यासह घरातील सर्व मंडळी आणि क्रीडाक्षेत्रातील सर्व सहकाºयांच्या सहकार्यामुळे हे यश संपादन करू शकले. सध्या क्रीडाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळत आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि शासनस्तरावरून चांगले सहकार्य केले जात आहे.
उदयोन्मुख खेळाडूंना काय सांगशील, असे विचारल्यावर तेजस्विनी म्हणाली, ‘‘त्यांनी आपले गुरू आणि आईवडिलांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा; कारण ते आपले कधीच वाईट इच्छित नाहीत. ते जे काही मार्गदर्शन करतात ते आपल्या चांगल्यासाठीच असते.’’
विमानतळावर तिच्या स्वागतासाठी तेजस्विनीचे पती समीर दरेकर, आई सुनीता सावंत, बहीण अनुराधा पित्रे, सासू कमल दरेकर, राज्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल, सहायक संचालक सुधीर मोरे, माजी ज्युनिअर जागतिक नेमबाज विजेता नवनाथ फडतरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.