Rajgad Fort: राजगडावर मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० पर्यटक जखमी, वेळीच मदत मिळल्याने तिघांचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 06:35 PM2024-10-14T18:35:32+5:302024-10-14T18:36:33+5:30

मुंबईवरून आलेल्या तीन जणांच्या ग्रुपमधील एका पर्यटकास मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने तो गंभीर जखमी झाला होता

Bee attack on Rajgad; 25 to 30 tourists were injured, three were saved due to timely help | Rajgad Fort: राजगडावर मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० पर्यटक जखमी, वेळीच मदत मिळल्याने तिघांचे वाचले प्राण

Rajgad Fort: राजगडावर मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० पर्यटक जखमी, वेळीच मदत मिळल्याने तिघांचे वाचले प्राण

वेल्हे: किल्ले राजगड (ता. राजगड) येथील बालेकिल्ल्याजवळ झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी झाले, तर तीन पर्यटकांना वेळीच मदत मिळल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास किल्ले राजगडावर घडली.

जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे रविवार (ता.१३) रोजी किल्ले राजगडावर पर्यटकांची मोठी वर्दळ होती. सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास बाले किल्ल्याजवळील असलेले मधमाशांचे पोळे उठल्याने येथील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये सुमारे २५ ते 3० पर्यटक किरकोळ जखमी झाले. यामध्ये काही पर्यटकांनी स्वतः ला वाचवण्यासाठी किल्ल्यावरती धावाधाव केली, तर काही पर्यटकांनी गडावर असलेल्या पद्मावती तळ्यामध्ये उड्या घेतल्या. मधमाशांनी चावा घेतल्यामुळे गडावरील पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे व विशाल पिलावरे यांनी पर्यटकांना सूचना करत काही पर्यटकांना पुरातत्व विभागाच्या कार्यालयामध्ये आसरा दिला.

दरम्यान, जीव वाचवण्याच्या आकांताने काही पर्यटन गडाच्या खाली पळाले त्यामध्ये मुंबईवरून आलेल्या तीन जणांच्या ग्रुपमधील प्रथम अहिरे (वय.२४) अंधेरी वेस्ट मुंबई या पर्यटकास मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तसाच तो जीव वाचवण्यासाठी गड उतरू लागला, दरम्यान तो दोन ते तीन ठिकाणी तोल जाऊन घसरला. किल्ला अर्धा उतरल्यानंतर त्याला उलटीचा त्रास होऊ लागला. दरम्यान, गडावर जात असलेल्या बारामती येथील रणजीत बिचकुले, मारुती वाघमारे, योगेश मलगुंडे, अनिकेत मलगुंडे, स्वप्नील खरात या तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गडावर न जाण्याचा निर्णय घेत प्रथम अहिरे याच्या अंगावरील मधमाशांचे काटे काढून त्यास पाणी दिले व त्यास एकमेकांनी पकडून मदत करत गडावरून खाली आणले. दरम्यान, त्याच्यासोबत असणारे दोन पर्यटक विशाल गायकवाड व शुभम खरे दोघेही राहणार अंधेरी वेस्ट मुंबई यांनी मधमाशांपासून जीव वाचवण्यासाठी झाडांमध्ये उडी मारली असल्याची माहिती प्रथम अहिरे यांनी बारामतीतील पर्यटकांना दिल्यानंतर गडावर संपर्क करण्यात आला.

Web Title: Bee attack on Rajgad; 25 to 30 tourists were injured, three were saved due to timely help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.